IND vs AUS 3rd Test : भारत-ऑस्ट्रेलिया (Ind vs Aus) यांच्यातल्या तिसरा कसोटी सामन आजपासून (1 मार्च) इंदूर येथे सुरू होणार आहे. भारताने बॉर्डर-गावस्कर मालिकेत 2-0 अशी आघाडी घेत आपली पकड कायम ठेवली. मात्र, भारताला हा सामना जिंकून आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित करण्याची संधी आहे. दरम्यान भारत ने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. या कसोटी सामन्यामध्ये रोहित शर्माने के एल राहुलला संघाबाहेर केले असून त्याच्या जागी शुभमन गिलचा समावेश केला आहे.
टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये आतापर्यंत 16 पैकी 10 सामने जिंकले आहेत. यामध्ये 4 सामन्यांत पराभव आणि 2 सामने अनिर्णित राहिले आहेत. तसेच टीम इंडिया 64.06 पॉईंट टक्केवारीसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र आता भारतीय क्रिकेट संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरी गाठायची असेल तर उर्वरित दोन सामन्यांपैकी एक सामना टीम इंडियाला जिंकावाच लागेल. दुसरीकडे, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने आतापर्यंत 17 पैकी 10 कसोटी जिंकल्या आहेत. यामध्ये 3 सामन्यांत पराभव झाला असून 4 सामने अनिर्णित राहिले आहेत. ऑस्ट्रेलियन संघाने 66.67 गुणांच्या टक्केवारीसह यापूर्वीच अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया (Ind vs Aus) यांच्यातल्या तिसरा कसोटी सामना आजपासून म्हणजेच 1 मार्च 2023 ला सुरू होत आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना सकाळी 9.30 वाजता सुरू होईल. त्यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होणार आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया (Ind vs Aus) यांच्यातल्या तिसरा कसोटी सामना लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर पाहता येईल. तसेट हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग पाहू शकता.
रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, श्रीकर भरत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, उमेश यादव, मोहम्मद सिराज
उस्मान ख्वाजा, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लबुशेन, स्टीव्ह स्मिथ, पीटर हॅंड्सकॉम्ब, कॅमेरून ग्रीन, एलेक्स केरी, मिशेल स्टार्क, नॅथन लायन, टॉड मर्फी, मॅथ्यू कुह्नेमन