चौथ्या वनडेत पांड्याने केला हा अनोखा रेकॉर्ड, बनला ‘सिक्सर किंग’

पाच वनडे सामन्यांच्या सीरिजच्या चौथ्या सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाने मात दिली. ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा बॅटींग करत टीम इंडियासमोर ३३५ रन्स केले होते.

Updated: Sep 29, 2017, 08:03 PM IST
चौथ्या वनडेत पांड्याने केला हा अनोखा रेकॉर्ड, बनला ‘सिक्सर किंग’ title=

नवी दिल्ली : पाच वनडे सामन्यांच्या सीरिजच्या चौथ्या सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाने मात दिली. ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा बॅटींग करत टीम इंडियासमोर ३३५ रन्स केले होते.

या टारगेटचा पाठलाग करताना विराट सेना ८ विकेट गमावून ३१३ इतकेच रन्स करू शकली. पण या सामन्यात हार्दिक पांड्याने एक रेकॉर्ड आपल्या नावावर केला. 

ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने या सामन्यात एक शानदार रेकॉर्ड त्याच्या नावावर केला. या सामन्यात पांड्याने ४० बॉल्समध्ये ४१ रन्सची शानदार खेळी केली. या खेळीत त्याने तीन सिक्सर लगावले. हे तीन सिक्सर लगावल्यावर पांड्या २०१७ मध्ये वनडे सामन्यात सर्वात जास्त सिक्सर लगावणारा खेळाडू ठरला आहे. त्याने इंग्लंडच्या ऑयन मॉर्गनचा २६ सिक्सरचा रेकॉर्ड तोडत तो सिक्सर किंग झाला आहे. पांड्याने २०१७ मध्ये २१ वनडे सामन्यांमध्ये १७ खेळीत एकूण २८ सिक्सर लगावले आहेत. 
 
या यादीत तिस-या क्रमांकावर १५ सामन्यांमध्ये २४ सिक्सर लगावणारा बेन स्टोक्स हा आहे. तर २०१७ मध्ये सर्वात जास्त सिक्सर लगावणारा चौथा खेळाडू रोहित शर्मा हा आहे. तर कोहली या यादीत पाचव्या नंबरवर आहे. 

तेच महेंद्र सिंह धोनीने २०१७ मध्ये २२ सामन्यांमध्ये १६ सिक्सर लगावले. धोनी या यादीत ७व्या नंबरवर आहे. २०१७ मध्ये सर्वाधिक सिक्सर लगावणा-या खेळाडूंच्या या यादीत टॉप दहामध्ये ४ भारतीय खेळाडू आहेत.