धोनीच्या बॅटिंग ऑर्डरवरुन सोशल मीडियावर कोहली झाला ट्रोल

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने २१ धावांनी विजय मिळवला. यासोबतच भारताची विजयी मालिका खंडित झाली. ३३५ धावाच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला ३१३ धावा करता आल्या.

Updated: Sep 29, 2017, 06:17 PM IST
धोनीच्या बॅटिंग ऑर्डरवरुन सोशल मीडियावर कोहली झाला ट्रोल title=

बंगळूरु : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने २१ धावांनी विजय मिळवला. यासोबतच भारताची विजयी मालिका खंडित झाली. ३३५ धावाच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला ३१३ धावा करता आल्या.

या पराभवानंतर सोशल मीडियावर कोहली चांगलाच ट्रोल झालाय. धोनीला सातव्या नंबरवर पाठवण्याच्या कोहलीच्या चुकीमुळेच भारत सामना हरल्याचा आरोप फॅन्सनी केलाय. 

धोनीला वरच्या क्रमांकावर फलंदाजीस पाठवले असते तर भारत जिंकला असता असे अनेक फॅन्सचे म्हणणे होते. धोनीला सातव्या क्रमांकावर फलंदाजीस पाठवण्यावरुन कोहलीवर सोशल मीडियावरुन जोरदार टीका केली जातेय.