इंदौर कसोटीत मयांकचं द्विशतक; भारताकडे ३४३ धावांची भक्कम आघाडी

भारतानं आज दिवसाखेर सहा गड्यांच्या मोबदल्यात ४९३ धावा केल्या.

Updated: Nov 15, 2019, 10:16 PM IST
इंदौर कसोटीत मयांकचं द्विशतक; भारताकडे ३४३ धावांची भक्कम आघाडी title=

इंदौर : इंदौर येथे सुरू असलेल्या टेस्ट मॅचमध्ये दुसऱ्या दिवशी भारतानं दमदार खेळी करत बांग्लादेशपुढं धावांचा डोंगर उभा केला. मयांक आग्रवालच्या तुफानी डबल सेंच्युरीच्या जोरावर भारतानं आज दिवसाखेर सहा गड्यांच्या मोबदल्यात ४९३ धावा केल्या. तर बांग्लादेशवर ३४३ धावांची आघाडी घेतली आहे. सध्या रविंद्र जडेजा ६० तर उमेश यादव २५ धावावर नाबाद खेळत आहेत. परंतु अंधुक प्रकाशामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला आहे.   

दिवसाच्या सुरवातीला मयांक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजाराने आपली अर्धशतके पूर्ण केली. त्यानंतर पुजारा ५४ धावांवर बाद झाला त्याच्या पाठोपाठ विराटलाही शून्यावर हार मानावी लागली. अखेर रहाणेच्या साथीने अग्रवालने डाव सावरला. 

त्यानंतर रहाणे देखील ८६ धावांवर बाद झाला आणि अग्रवालने मात्र आपले दमदार द्विशतक ठोकले. २४३ धावा करणारा मयांक या खेळीमध्ये सरासरी ६६.६७च्या स्ट्राईक रेटने तो खेळत होता. मयांक बाद झाल्यावर जाडेजाने तुफान फटकेबाजी केली. बांगलादेशकडून अबू जायेदने ४ तर मेहिदी हसन मिराज आणि एबादत यांनी १-१ गडी बाद केला.  

बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने शानदार सुरुवात केली. बांगलादेश संघाचा पहिला डाव अवघ्या १५० धावांत आटोपला.