Ind vs Eng 4th Test Day 3 | हिटमॅन रोहित शर्माची रेकॉर्ड ब्रेक खेळी, दिग्गजांना पछाडलं, ठरला दुसराच फलंदाज

 टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीतील तिसऱ्या दिवशी (Ind vs Engl 4th Test Day 3) हिटमॅन रोहित शर्माने (Hitman Rohit Sharma) रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे.

Updated: Sep 4, 2021, 07:25 PM IST
Ind vs Eng 4th Test Day 3 | हिटमॅन रोहित शर्माची रेकॉर्ड ब्रेक खेळी, दिग्गजांना पछाडलं, ठरला दुसराच फलंदाज title=

लंडन : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीतील तिसऱ्या दिवशी (Ind vs Engl 4th Test Day 3) हिटमॅन रोहित शर्माने (Hitman Rohit Sharma) रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. रोहितने ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनसह (Matthew Hayden) लिटिल मास्टर सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांना मागे टाकत विक्रमाला गवसणी घातली आहे. तसेच रोहित अशी कामगिरी करणारा सचिननंतर एकूण दुसराच फलंदाज ठरला आहे. (india vs england 4th test day 3 Rohit Sharma become 2nd player who complete fastest 11 thousand runs as a opener)

काय आहे विक्रम?  

रोहित ओपनर म्हणून सर्वात कमी डावात वेगवान आंतरराष्ट्रीय 11 हजार धावांचा टप्पा गाठणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. रोहितने हा कारनामा अवघ्या 246 डावांमध्ये  केला आहे. तसेच सर्वात कमी डावांमध्ये ओपनर म्हणून 11 हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम हा सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. सचिनने ही कामगिरी अवघ्या 241 डावांमध्ये केली आहे.

सर्वात कमी डावात 11 हजार धावा करणारे ओपनर

सचिन तेंडुलकर - 241

रोहित शर्मा - 246*

मॅथ्यू हेडन - 251

सुनील गावसकर - 258

गॉर्डन ग्रीनिज - 261

दरम्यान रोहितने नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला होता. रोहित अशी कामगिरी करणारा 8 वा फलंदाज ठरला.

सामन्याचा धावता आढावा... 

दरम्यान शार्दुल ठाकूर आणि कर्णधार विराट कोहलीच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने पहिल्या डावात 191 धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात प्रत्युत्तरादाखल 290 धावा करत 99 धावांची आघाडी घेतली. 

त्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या डावाची शानदार सुरुवात केली. रोहित शर्मा आणि केएल राहुल या सलामी जोडीने 83 धावांची सलामी भागीदारी केली. टीम इंडियाला केएल राहुलच्या रुपात पहिला धक्का बसला. केएलचं अर्धशतक अवघ्या 4 धावांनी हुकलं. केएलने 46 धावांची खेळी केली. केएलनंतर चेतेश्वर पुजारा मैदानात आला. दरम्यान ताज्या आकडेवारीनुसार टीम इंडियाने  54 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 153 धावा केल्या आहेत.