मुंबई : आयपीएलमध्ये अनेक युवा प्लेयर्स आपल्या खेळाची चमक दाखवण्यात यशस्वी ठरले आहेत, तर काही सिनीयर आणि दिग्गज खेळाडू साजेशी कामगिरी करण्यास अपयशी ठरलेत. याच कामगिरीचा फटका आता भारताच्या एका सिनीयर खेळाडूला बसला आहे. कारण या खेळाडूची भारतीय संघात निवड झाली नाही आहे.
यंदाच्या आयपीएल मोसमात पंजाबचा माजी कर्णधार के एल राहूल आपल्या लखनऊ या संघासह मैदानात उतरला होता.त्यामुळे पंजाबच्या कर्णधाराची जबाबदारी मयंक अग्रवालवर आली. मात्र कर्णधारपदी आल्यावरही त्याला चांगली करता आली नाही. संघाला चांगली सुरुवात करून देण्यात तो अपयशी ठरला. त्याने फलंदाजीचा क्रमही बदलला, मात्र तोही निर्णय कामी आला नाही. आयपीएलमध्ये त्याच्या बॅटीने धावांचा दुष्काळ पाहिला. या सर्वाचा फटका त्याला बसल्याचे बोलले जातेय.
इंग्लंड दौऱ्यावरील एकमेव कसोटी सामन्यात टीम इंडियाची घोषणा करण्यात आली होती. या संघात मयंक अग्रवालला बाहेरचा रस्ता दाखवण्याता आला आहे. मयंक अग्रवालला श्रीलंकेविरुद्ध चांगली कामगिरी करता आली नव्हती. मयंकच्या बॅटीने बऱ्याच काळापासून धावांचा दुष्काळ पाहिलाय. मयंक अग्रवाल धावा काढण्यासाठी धडपडताना दिसतोय. आयपीएलमध्येही त्याला चमकदार कामगिरी करता आली नाही. त्यामुळे भारतीय संघाबाहेर होताच मयंक अग्रवालच्या कारकिर्दीवर संकटाचे ढग दाटून येत आहेत.
कसोटी कामगिरी
मयंक अग्रवालने भारतासाठी 21 कसोटी सामन्यांमध्ये 4 शतकांसह 1488 धावा केल्या आहेत.
आयपीएल कामगिरी
मयंक अग्रवाल आयपीएल 2022 मध्ये फ्लॉप ठरलाय. आयपीएल 2022 च्या 13 सामन्यांमध्ये त्याने 196 धावा केल्या.
122.50 चा त्याचा स्ट्राईक रेट होता. तर 16.33च्या सरासरीने त्याने या धावा केल्या आहेत. त्याच्या खराब फॉर्मचा फटका संघाला बसला. मयंक कधीच संघाला दमदार सुरुवात करून देऊ शकला नाही. याच कारणामुळे त्याने फलंदाजीचा क्रमही बदलला, मात्र संघाचे नशीब बदलू शकले नाही. मयंक अग्रवालच्या धावा काढता न आल्याने नंतरच्या फलंदाजांवर दबाव वाढायचा. मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्जने केवळ 7 सामने जिंकले आहेत.
कोरोनामूळे रखडला सामना
पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील ४ सामन्यांनंतर भारतीय संघ २-१ ने पुढे आहे. गेल्या वर्षी, कोरोनाच्या प्रकरणामुळे, या मालिकेतील शेवटचा सामना खेळला गेला नाही, जो यावर्षी जुलैमध्ये खेळला जाईल. या मालिकेसाठी वृध्दिमान साहा आणि इशांत शर्मा यांचीही टीम इंडियात निवड झालेली नाही. भारतीय संघाला शेवटचा सामना जिंकून मालिका 3-1 अशी जिंकायची आहे.
इंग्लंडविरुद्ध टीम इंडिया :
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, आर अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा.