वानखेडेवर किवींविरुद्ध मुकाबल्यासाठी भारत सज्ज

भारतीय संघ आजपासून सुरु होत असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज झालाय. भारताचा आज पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध होतोय. वानखेडे स्टेडियमवर हा सामना रंगतोय.

Updated: Oct 22, 2017, 08:02 AM IST
वानखेडेवर किवींविरुद्ध मुकाबल्यासाठी भारत सज्ज title=

मुंबई : भारतीय संघ आजपासून सुरु होत असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज झालाय. भारताचा आज पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध होतोय. वानखेडे स्टेडियमवर हा सामना रंगतोय.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत विजय मिळवल्यानंतर आता भारतीय संघ या मालिकेतही विजयी परंपरा कायम राखण्यासाठी सज्ज झालाय. कर्णधार विराट कोहली आणि कंपनी विजयाच्या इराद्यानेच मैदानावर उतरतील. 

याआधी दोन वर्षांपूर्वी वानखेडेवर शेवटचा आंतरराष्ट्रीय वनडे सामना खेळवण्यात आला होता. त्यात दक्षिण आफ्रिकेकडून भारताचा दारुण पराभव झाला होता. त्यानंतर दोन वर्षांनी वानखेडेवर हा सामना होतोय. 

भारतीय संघात सध्या चायनामन कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल असे युवा क्रिकेटर्स आहेत. कुलदीप यादव, युझवेंद्र, हार्दिक यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे या मालिकेतही त्यांच्याकडून हीच अपेक्षा असेल. 

दुसरीकडे न्यूझीलंड संघाची मदार अनुभवी क्रिकेटर रॉस टेलरवर असेल. अध्यक्षीय संघाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने शानदार विजय मिळवला होता.

सामन्याची वेळ- दुपारी दीड वाजता.