India vs New Zealand T20 Series: वनडे सिरीजनंतर इंडिया आणि न्यूझीलंड (India vs New Zealand Series) यांच्यामध्ये आता टी-20 सिरीज रंगणार आहे. शुक्रवारी रांचीमध्ये या सिरीजमधील पहिला सामना खेळवला जाणार आहे. कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) या सिरीजचं नेतृत्व करणार आहे. मात्र यावेळी एक मोठा प्रश्न आहे, तो म्हणजे, पहिल्या सामन्यात ओपनिंग कोण करणार?
भारतीय कर्णधार हार्दिक पंड्याने सामन्याच्या एक दिवस आधी म्हणजेच गुरुवारी सांगितलं की, फॉर्ममध्ये असलेला ओपनर फलंदाज शुभमन गिलला (Shubman Gill) न्यूझीलंडविरूद्धच्या टी-20 सिरीजमध्ये खेळण्याची संधी मिळेल. तो उत्तम फॉर्ममध्ये असल्याने त्याला टीममध्ये स्थान मिळणार आहे. हार्दिक पंड्याच्या म्हणण्याचा अर्थ, पृथ्वी शॉला (Prithvi Shaw) प्लेईंग 11 मध्ये खेळण्यासाठी वाट पहावी
गिलने गेल्या 4 सामन्यांमध्ये एक द्विशतकासोबत 3 शतकं ठोकली आहे. त्यामुळे पहिल्या टी-20 सामन्यामध्ये गिल आणि इशान किशन ओपनिंग करणार असल्याचं जवळपास निश्चित आहे.
पहिल्या टी-20 सामन्यापूर्वी हार्दिकने म्हटलं की, गेल्या काही काळात शुभमन गिलने चांगला खेळे केला आहे, त्यामुळे ओपनिंग तोच करणार आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-ट्वेंटी मालिकेतील पहिला सामना 27 जानेवारी रोजी रांचीच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाईल. या मालिकेसाठी टीम इंडियाची कमान हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) खांद्यावर असणार आहे. अशातच आता टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूमचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय.
पहिला सामना खेळण्यासाठी टीम इंडिया राँचीच्या मैदानात (JSCA International Stadium Complex, Ranchi ) पोहोचली आणि सराव देखील सुरू केलाय. त्यावेळी राँचीचा लोकल बॉय आणि टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) टीम इंडियाची भेट घेतली. त्याचा व्हिडिओ बीसीसीआयने (BCCI) ट्विट करत शेअर केला आहे.
हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ, मुकेश कुमार.