भारत वि. न्यूझीलंड : टेस्टमध्ये कोणाचं पारडं जड

शुक्रवारपासून रंगणार टेस्ट सामना

Updated: Feb 20, 2020, 08:14 AM IST
भारत वि. न्यूझीलंड : टेस्टमध्ये कोणाचं पारडं जड title=

मुंबई : विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय टीम न्यूझीलंडमध्ये टेस्ट सीरीज खेळणार आहे. शुक्रवार पासून पहिल्या टेस्ट सामन्याला सुरुवात होणार आहे. २ सामन्यांच्या या टेस्ट सीरीजमध्ये कोण जिंकेल याबाबत उत्सूकता आहे. ५ सामन्यांच्या टी20 सीरीजमध्ये भारताने संपूर्ण सामने जिंकले होते. त्यानंतर झालेल्या वनडे सीरीजमध्ये न्यूझीलंडने सर्व ३ सामने जिंकले होते. त्यामुळे आता टेस्ट सीरीज कोण जिंकणार याबाबत उत्सूकता निर्माण झाली आहे. 

दोन्ही संघामध्ये काही बदल करण्यात आले आहेत. टीम इंडियामध्ये इशांत शर्माचं आगमन झालं आहे. तर न्यूझीलंडमध्ये ट्रेंट बोल्टचं आगमन झालं आहे.

भारताने आतापर्यंत न्यूझीलंडमध्ये २३ टेस्ट सामने खेळले आहेत. ज्यामध्ये ५ सामने त्यांनी जिंकले आहे. तर ८ सामन्यांमध्ये पराभव झाला आहे. १० सामने ड्रॉ झाले आहेत. दोन्ही संघाने एकमेकांविरुद्ध ५७ सामने खेळले आहेत. ज्यापैकी भारताने २१ तर न्यूझीलंडने १० सामने जिंकले आहेत. तर १० सामने ड्रॉ झाले होते.

भारतीय टीमने मागील ७ टेस्ट सामने जिंकले आहे. २०११ नंतर लागोपाठ टेस्ट सामने जिंकण्याच्या यादीत भारतीय टीम सर्वोच्च स्थानी आहे. त्यामुळे न्यूझीलंड विरुद्ध हा रेकॉर्ड कायम ठेवण्याचा प्रयत्न भारतीय संघाचा असेल.

न्यूझीलंड टीमने आतापर्यंत ९९ टेस्ट सामने जिंकले आहेत. पहिल सामना जर न्यूझीलंडने जिंकला तर १०० सामने जिंकणाऱ्यांच्या यादीत न्यूझीलंड सातव्या स्थानी येईल. न्यूझीलंडने आतापर्यंत ४४० सामने खेळले आहेत. ज्यामध्ये ९९ सामने त्यांनी जिंकले आहेत. तर १७५ सामन्यांमध्ये पराभव झाला आहे.