विराट कोहलीकडे मौका मौका! पाकिस्तानविरुद्ध स्पेशल 'सेंच्युरी' करण्याची संधी

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली आणखी एका विक्रमाच्या उंबरठ्यावर आहे. 

Updated: Sep 4, 2022, 06:15 PM IST
विराट कोहलीकडे मौका मौका! पाकिस्तानविरुद्ध स्पेशल 'सेंच्युरी' करण्याची संधी title=

India Vs Pakistan Asia Cup 2022 Virat Kohli Special Century: आशिया कप स्पर्धेत सुपर फेरीत भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे. साखळी फेरीत पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर पुन्हा एकदा दोन्ही संघ आमनेसामने आले आहेत. साखळी फेरीत भारताने पाकिस्तान आणि हाँगकाँगला पराभूत करत सुपर 4 फेरीत स्थान मिळवलं आहे. असं असलं तरी क्रीडाप्रेमींच्या नजरा विराट कोहलीकडे लागून आहेत. गेल्या काही महिन्यांपासू विराट कोहली खराब फॉर्ममध्ये आहे. मात्र हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात विराटने 44 चेंडूत नाबाद 59 धावा केल्या आणि पुन्हा सूर गवसल्याचं दाखवलं आहे. आता पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली आणखी एका विक्रमाच्या उंबरठ्यावर आहे. 

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 97 षटकार मारले आहेत. त्यामुळे पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात षटकारांची सेंच्युरी करण्याची नामी संधी आहे. या सामन्यात 3 षटकार मारल्यानंतर विराट कोहली स्पेशल क्लबमध्ये सामील होणार आहे. आतापर्यंत फक्त रोहित शर्माने हा विक्रम केला आहे. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 षटकार ठोकणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत फक्त रोहित शर्माचे नाव आहे. त्यामुळे या स्पेशल क्लबमध्ये सहभागी होण्याची विराट कोहलीला चांगली संधी आहे.

रोहित शर्मा व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर आणि इंग्लंडचा माजी कर्णधार इयॉन मॉर्गन यांनी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 षटकार ठोकले आहेत. 3 षटकार मारल्यानंतर विराट कोहली टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 षटकार मारणारा दहाववा फलंदाज ठरणार आहे. विराट कोहलीने आतापर्यंत 101 सामन्यात 97 षटकार मारले आहेत. पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्या सामन्यात विराट कोहलीने 34 चेंडूत 35 धावा केल्या होत्या. या खेळीत 3 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे.