इंदूर : भारताने श्रीलंकेविरुद्ध च्या दुसऱ्या टी-२० सामन्यात ७ विकेटने दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने ३ सामन्यांच्या या सिरीजमध्ये १-० ने आघाडी घेतली आहे. गुवाहाटीमध्ये झालेला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. आता १० जानेवारीला पुण्यात तिसरा सामना रंगणार आहे. टॉस जिंकत आधी भारताने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. श्रीलंकेने २० ओव्हरमध्ये ९ विकेट गमवत १४२ रन केले होते. भारताने १७.३ ओव्हरमध्ये १४३ रनचं आव्हान पूर्ण करत श्रीलकेंला पराभूत केलं.
भारताकडून ओपनर लोकेश राहुलने ४५, श्रेयस अय्यरने ३४, शिखर धवनने ३२ आणि विराट कोहलीने नाबाद ३० रन केले. श्रीलंकेच्या हसरंगाने २ तर लाहिरूने प्रत्येकी १ विकेट घेतली.
याआधी २२ डिसेंबर २०१७ ला झालेल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव केला होता. या सामन्यात रोहित शर्माने टी-20 आंतरराष्ट्रीय इतिहासातील सर्वात जलद शतक ठोकलं होतं. रोहित शर्माने फक्त ३५ बॉलमध्ये शतक ठोकलं होतं. या सामन्यात रोहित शर्माने ४३ बॉलमध्ये ११८ रन केले होते. तर केएल राहुलने ४९ बॉलमध्ये ८९ रन केले होते. भारताने या सामन्यात २० ओव्हरमध्ये २६० रन केले होते.
That's that from Indore.#TeamIndia win by 7 wickets. Lead the three-match series 1-0.#INDvSL pic.twitter.com/5mtCxcHFHr
— BCCI (@BCCI) January 7, 2020
श्रीलंकेकडून कुशल परेराने ३४, दानुष्का गुणाथिलकाने २० तर अविष्का फर्नांडोने २२ रन केले. तर धनंजय डी सिल्वाने १७ आणि वानिंडु हसरंगाने नाबाद १६ रन केले. भारताकडून शार्दुल ठाकुरने तीन विकेट, नवदीप सैनी आणि कुलदीप यादवने प्रत्येकी दोन-दोन विकेट, तर जसप्रीत बुमराह आणि वॉशिंगटन सुंदरने प्रत्येकी एक विकेट घेतली.