India Vs Sri Lanka T20 Match: भारत विरुद्ध श्रीलंका तीन सामन्याची टी 20 मालिकेला आजपासून सुरु होणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघ श्रीलंकेविरुद्ध मैदानात उतरणार आहे. वनडे मालिकेसाठीही हार्दिक पांड्याकडे नेतृत्व असण्याची शक्यता आहे. टी 20 मालिकेच्या पार्श्वभूमीवर कर्णधार हार्दिक पांड्यानं आपलं मत व्यक्त केलं आहे. आशिया कपमधील पराभवाचा वचपा काढण्यासाठी संघ सज्ज असल्याचं पांड्याने संकेत दिले आहे. आशिया कप स्पर्धेतील बाद फेरीत श्रीलंकेनं भारताला 6 गडी राखून पराभूत केलं होतं. त्यामुळे भारताचं आशिया कप विजयाचं स्वप्न भंगलं होतं. आता श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून जोरदार कमबॅक करण्याचा भारताचा निर्धार आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडिया चांगली छाप पाडेल असं हार्दिक पांड्याने सामन्यापूर्वी सांगितलं. पांड्याने सांगितलं की, वचपा काढणं हा आमचा एकमेव हेतू नाही.
"आम्ही वचपा काढण्याचा विचार करत नाही. आम्हाला चांगले क्रिकेट खेळायचे आहे. पण इतकं सांगतो की, ते भारतात खेळणार आहेत. त्यामुळे त्यांना डिवचण्याची गरज नाही, त्यांना दबावात आणण्यासाठी आमची देहबोली पुरेशी आहे, जे आम्ही करू,” असे कर्णधार हार्दिक पांड्याने सांगितलं.
हार्दिक पांड्याने टी-20 कर्णधार म्हणून चमकदार कामगिरी केली आहे. यावेळी त्यांचा सामना आशियाई चॅम्पियन श्रीलंकेशी होत आहे. श्रीलंकेचे खेळाडू लंका प्रीमियर लीगमध्ये चमक दाखवल्यानंतर येथे आले असून त्यांनी राष्ट्रीय संघात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा समावेश केला आहे. भारताने आपल्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली असून युवा संघ निवडला आहे.
बातमी वाचा- IND vs SL : टीम इंडियासाठी श्रीलंकेचे 'हे' खेळाडू ठरू शकतात घातक, जाणून घ्या
टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ: हार्दिक पंड्या (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (वीसी), दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग , हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार.
टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ: हार्दिक पंड्या (क), इशान किशन (विकेटकीपर), रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (वीसी), दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग , हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार.