IND vs SL 2022 T20 : भारत विरुद्ध श्रीलंका टी 20 सामन्याआधी मोठी बातमी

भारत विरुद्ध श्रीलंका टी 20 सामना पाहण्यासाठी तुम्हाला स्टेडियममध्ये एन्ट्री मिळणार की नाही? पाहा

Updated: Feb 22, 2022, 01:06 PM IST
IND vs SL 2022 T20 : भारत विरुद्ध श्रीलंका टी 20 सामन्याआधी मोठी बातमी title=

मुंबई : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज 3 टी 20 सामन्याची सीरिज टीम इंडियाने जिंकली आहे. त्यानंतर आता भारत विरुद्ध श्रीलंका टी 20 सीरिज 24  फेब्रुवारीपासून सामने सुरू होत आहेत. या सीरिजआधी क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज शेवटचा सामना पाहण्याची क्रिकेटप्रेमींना परवानगी मिळाली होती. 

आता श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया होणारा सामना देखील क्रिकेट प्रेमींना पाहता येणार आहे. क्रिकेटप्रेमींना कोरोनाच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करून स्टेडियममध्ये एन्ट्री देण्यात येणार आहे. स्टेडियममध्ये 50 टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्याची परवानगी मिळाली आहे.

24 फेब्रुवारीपासून भारत विरुद्ध श्रीलंका टी 20 सीरिजला सुरुवात होणार आहे. मात्र यामध्ये 26 आणि 28 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या दोन सामन्यांसाठी नागरिकांना 50 टक्के क्षमतेनं स्टेडियममध्ये प्रवेश देण्याची परवानगी मिळाली आहे.

धर्मशाला स्टेडियमवर हे सामने होणार असल्याची माहिती मिळाली आहे. या स्टेडियमची क्षमता 22000 लोकांची आहे. मात्र 11000 लोकांनाच प्रवेश मिळणार आहे. कॉरपरेट बॉक्स, वीआईपी बॉक्स, क्लब लॉज सोबत 14 स्टॅण्ड असणार आहेत. 

स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी येणाऱ्या क्रिकेटप्रेमींना कोरोनाच्या सर्व गाइडलाईन्सचं पालन करणं बंधनकारक असणार आहे. कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन होणार नाही याची जबाबदारी प्रेक्षकांनी घेणं गरजेचं आहे.