राजकोट : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या टेस्ट मॅचमधून धमाकेदार फलंदाज पृथ्वी शॉ ने पदार्पण केलं. आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात त्याने हाफ सेंच्युरी ठोकली आहे. पृथ्वी हा टीम इंडियासाठी डेब्यू करणारा 13 वा सर्वात कमी वयाचा बॅट्समन ठरला.
पृथ्वीने चेतेश्वर पुजारासोबत मिळून टीम इंडियाला 21 ओव्हरमध्ये 104 रन्सची भागीदारी करुन दिली आहे. यावेळी पृथ्वीने 64 बॉलमध्ये 61 रन्स केले तर चेतेश्वर पुजाराने 60 बॉलमध्ये 41 रन्स केले. पहिल्या ओव्हरमध्येच के.एल.राहुल आऊट झाल्यानंतर पृथ्वीने आपल्या अंदाजात बॅटींगला सुरूवात केली. 5 ओव्हरनंतर पृथ्वीने 22 रन्स केले होते तर पुजारा तेव्हा 1 रन्सवर खेळत होता.
भारत आणि वेस्टइंडिज यांच्यात आजपासून 2 टेस्ट सिरीजच्या सामन्याला सुरुवात होत आहे. या सिरीजमधला पहिला सामना राजकोटमध्ये खेळला जाणार आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकत आधी बँटींग करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सीरीजकडे आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्याची तयारी म्हणून देखील पाहिलं जात आहे. पृथ्वी शॉने आजच्या सामन्यातून टेस्ट करिअरमध्ये डेब्यू केलं आहे. भारताला सुरुवातीलाच एक झटका बसला आहे. के. एल राहुल शुन्यावर माघारी परतला आहे.
पृथ्वी शॉ, के. एल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कॅप्टन), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, आर. अश्विन, रविंद्र जडेजा, उमेश यादव, कुलदीप यादव, मोहम्मद शामी
वेस्टइंडीज : क्रैग ब्रैथवेट (कॅप्टन), केरन पावेल, शाई होप, शिमरोन हेटमायेर, रोस्टन चेस, सुनील अम्बीरस, देवेंद्र बिशू, शॉन डॉवरिच, शेनन गैब्रिएल, शेमरन लुइस, कीमो पॉल.