आऊट ऑफ फॉर्म विराट कोहलीवर टीका सुरुच, आता चाहत्यांनीच सुनावलं

बीसीसीआयने (Bcci) झिंबाब्वे विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी भारतीय (Zim vs Ind) संघ जाहीर केला आहे. 

Updated: Jun 13, 2023, 08:21 PM IST
आऊट ऑफ फॉर्म विराट कोहलीवर टीका सुरुच, आता चाहत्यांनीच सुनावलं  title=

विजय सुर्वे, झी मीडिया, मुंबई : बीसीसीआयने (Bcci) झिंबाब्वे विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी भारतीय (Zim vs Ind) संघ जाहीर केला आहे. या मालिकेसाठी शिखर धवनला (Shikhar Dhawan) पुन्हा एकदा कर्णधार करण्यात आलंय. तर या मालिकेसाठी विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे त्याला सतत देण्यात येणाऱ्या विश्रांतीवरून आता संताप व्यक्त होतोय.  

पुढील महिन्यात झिम्बाब्वे विरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे सीरिजसाठी भारतीय संघ जाहीर केला आहे. विशेष म्हणजे या मालिकेसाठी भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीलाही विश्रांती देण्यात आली आहे. आधीच वेस्ट इंडिज विरूद्ध दौऱ्यात त्याला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजनंतर झिम्बाब्वे दौऱ्यातून कोहलीला वगळल्याबद्दल चाहत्यांनी बीसीसीआयवर रोष व्यक्त केला आहे. 

शतकाचा दुष्काळ संपेना
33 वर्षीय विराट कोहलीने नोव्हेंबर 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटचे शतक झळकावले. त्यानंतर कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर त्याने 136 धावांची इनिंग खेळली. त्यानंतर विराट कोहलीने 68 सामन्यांच्या 79 डावांमध्ये 2554 धावा केल्या, ज्यात 24 अर्धशतकांचा समावेश आहे.

 झिम्बाब्वे विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडिया :  शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, ईशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज आणि दीपक चहर.