Game Over : भारतीय क्रिकेटमधील खळबळजनक सत्य उघड, स्टिंगमधील खुलाशानंतर बीसीसीआयची चेतन शर्मावर कारवाई?

Chetan Sharma : ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषकात भारतीय संघाच्या खराब कामगिरीनंतर चेतन शर्मा यांना हटविण्यात आले होते. पण बीसीसीआयने अलीकडेच चेतन शर्माला दुसऱ्यांदा निवड समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले. 

Updated: Feb 15, 2023, 09:50 AM IST
Game Over : भारतीय क्रिकेटमधील खळबळजनक सत्य उघड, स्टिंगमधील खुलाशानंतर बीसीसीआयची चेतन शर्मावर कारवाई? title=
indian cricket big Sting Operation BCCI likely to take action against Chetan Sharma after revelations in sting Cricket News in marathi

Zee News Sting Operation : भारतीय क्रिकेटमधील खळबळजनक सत्य समोर (Chetan Sharma Sting Operation) आले आहेत.  झी मीडियानं केलेला सर्वात मोठा गौप्यस्फोट आहे. भारतीय क्रिकेटमध्ये (Team India) सुरू असलेला खेळखंडोबा झी मीडियानं समोर आणलाय आणि यानंतर बीसीसीआयसुद्धा खडबडून जागी झालीय. भारतीय क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष सौरभ गांगुली (Sourav Ganguly) आणि टीम इंडियाचा (Team India) माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यांच्यातील वादाबाबत त्यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. त्यानंतर चीफ सिलेक्टर चेतन शर्मांवर (Chetan Sharma)  बीसीसीआयकडून  (BCCI) कारवाई होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

चेतन शर्मा यांचा खळबळजनक आरोप 

क्रिकेट जगताला हादरवून टाकणारा हा गौप्यस्फोट ज्या व्यक्तीनं केलाय ती व्यक्ती तुमच्या आवडत्या क्रिकेटपटूचं करिअर घडवू शकते, नाहीतर बरबादही करू शकते. ही कुणी साधीसुधी व्यक्ती नाही...हे आहेत जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डाचे म्हणजेच BCCIच्या निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा...
चेतन शर्माने स्टिंग ऑपरेशनमध्ये विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहसारख्या (Jasprit Bumrah) खेळाडूंवर मोठे आरोप केले आहेत. त्याने प्रशिक्षक राहुल द्रविड आणि विराट कोहली यांच्याशी झालेल्या संभाषणाचाही खुलासा केला आहे. चेतन शर्माने आरोप केला की 80 ते 85 टक्के तंदुरुस्त असूनही स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये झटपट पुनरागमन करण्यासाठी खेळाडू इंजेक्शन घेतात. (indian cricket big Sting Operation BCCI likely to take action against Chetan Sharma after revelations in sting Cricket News in marathi)

माजी कर्णधार विराट कोहली आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यात अहंकाराची लढाई असल्याचा आरोपही चेतन शर्माने केला आहे. झी न्यूजने चेतन शर्माशी संपर्क साधला असता, ते प्रतिक्रिया देण्यासाठी उपलब्ध नव्हते.

चेतन शर्मांवर कारवाई होण्याची शक्यता

दरम्यान, पीटीआय या वृत्तसंस्थेने म्हटलंय की, बीसीसीआय या प्रकरणाकडे लक्ष देत आहे कारण राष्ट्रीय निवडकर्ते कराराखाली आहेत आणि त्यांना मीडियाशी बोलण्याची परवानगी नाही. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गोपनीयतेच्या अटीवर पीटीआयला सांगितलं की, बीसीसीआयचं सचिव जय शाह चेतनच्या भवितव्याबाबत निर्णय घेतील. टी-20 कर्णधार हार्दिक पांड्या किंवा एकदिवसीय आणि कसोटी कर्णधार रोहित शर्मा हे अंतर्गत चर्चा उघड करू शकतात हे जाणून चेतनसोबत निवड बैठकीत बसायचं का, असा प्रश्न उपस्थित होतो.