India Vs South Africa : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने गमावला आहे. त्यामुळे आता दुसऱ्या सामन्यात (IND Vs SA 2nd Test) भारताच्या प्लेइंग 11 मध्ये बदल केला जाईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. पहिल्या कसोटीत एक डाव आणि 32 धावांनी झालेला पराभव कॅप्टन रोहितच्या (Rohit Sharma) जिव्हारी लागल्याचं बोललं जातंय. अशातच आता टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल झाल्याचं पहायला मिळणार आहे. त्यासाठी रोहितचा मास्टरप्लॅन देखील तयार झालाय.
येत्या 3 जानेवारीपासून खेळल्या जाणाऱ्या सामन्यासाठी आवेश खानचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटीदरम्यान टीम इंडियामध्ये दोन ते तीन बदल पाहायला मिळू शकतात. टीम इंडियाचा फिरकीपटू रवींद्र जडेजा कमबॅक करेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहेत. त्यामुळे आर आश्विनला नारळ दिला जाणार आहे. तर पहिल्या सामन्यात फिका पडलेल्या प्रसिद्ध कृष्णाला दुसऱ्या सामन्यात संधी मिळेल का? असा सवाल विचारला जातोय. कारण, कृष्णाच्या जागी आवेश खानला संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
श्रेयस अय्यर आणि यशस्वी जयस्वाल यांच्या कामगिरीवर देखील रोहित नाराज असल्याचं कळतंय. दोन्ही इनिंगमध्ये या दोघांनाही मोठी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे आता केएस भरतला संधी दिली जाईल की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दुसऱ्या सामन्यासाठी संभाव्य प्लेइंग इलेव्हन
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन) : डीन एल्गर, एडन मार्कराम, टोनी डी झोर्झी, टेम्बा बावुमा (कर्णधार), कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को जॅन्सन, जेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, नंद्रे बर्गर.
भारत (प्लेइंग इलेव्हन) : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, आवेश खान, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.