'मला भानच नव्हतं,' नीरज चोप्राने अखेर सत्य सांगितलं, कबुली देत म्हणाला 'पॅरिस ऑलिम्पिकमध्ये...'

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris OIympics 2024) नीरज चोप्राला (Neeraj Chopra) रौप्य पदकावर (Silver Medal) समाधान मानावं लागलं. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने (Arshad Nadeem) रेकॉर्डब्रेक कामगिरी करत सुवर्णपदक जिंकलं.   

शिवराज यादव | Updated: Sep 29, 2024, 04:19 PM IST
'मला भानच नव्हतं,' नीरज चोप्राने अखेर सत्य सांगितलं, कबुली देत म्हणाला 'पॅरिस ऑलिम्पिकमध्ये...' title=

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris OIympics 2024) नीरज चोप्राला (Neeraj Chopra) रौप्य पदकावर (Silver Medal) समाधान मानावं लागलं. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने (Arshad Nadeem) रेकॉर्डब्रेक कामगिरी करत सुवर्णपदक जिंकलं आणि नीरज चोप्राची सुवर्ण कामगिरी करण्याची संधी हुकली. दरम्यान पॅरिस ऑलिम्पिकमधील अंतिम सामन्याबाबत नीरज चोप्राने पहिल्यांदाच प्रामाणिक कबुली दिली आहे. नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकलं असतं तर सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये अशी कामगिरी करण्याची संधी होती. पण अर्शद नदीमने दुसऱ्या प्रयत्नात 92.97 मीटर दूर भाला फेकत आपल्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. नीरज चोप्रा यावेळी थोडासा दबावात असल्याचं जाणवत होतं. त्याने 89.45 मीटरची सर्वोत्तम कागिरी केली. 

नुकत्याच एका मुलाखतीत नीरज चोप्राने अर्शदने केलेला थ्रो आणि त्याच्यावर असलेला दबाव याबद्दल सांगितलं आहे. "पहिल्या थ्रोचा खेळाडूच्या मानसिकतेवर मोठ्या प्रमाणात परिणाम करतो. माझा पहिला थ्रो खरोखरच चांगला होता, पण मी फाऊल केला. ट्रॅक नवीन असल्याने मला काही समस्या येत होत्या. फाऊल टाळण्यासाठी मी त्यात जुळवून घेण्याचा प्रयत्न केला, पण ही स्पर्धा कठीण होती," असं हरियाणा येथे मिशन ऑलिम्पिक 2036 कार्यक्रमात नीरज म्हणाला.

"यानंतर नदीमने चांगला थ्रो केला. माझाही दुसरा थ्रो चांगला होता. पण यानंतर असं काही झालं, ते आपण म्हणतो ना की फक्त उत्साह असून कामाचं नाही, तर भानही असावं लागतं. त्यादिवशी कदातिच मी भानात नव्हतो. आपल्याला करायचं आहे याचा फार राग होता. पण यादरम्यान काही तांत्रिक गोष्टी निसटल्या," अशी कबुली नीरज चोप्राने दिली. 

पॅरिसमध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकण्यात नीरज अपयशी ठरला असला तर सलग दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. त्याने 2021 मध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं. नदीमने त्याच्या दुसऱ्या प्रयत्नात आश्चर्यकारक 92.97 मीटरचा पल्ला गाठला. नीरज चोप्राने दुसऱ्या प्रयत्नात 89.45 मीचर दूर भाला फेकत रौप्यपदक जिंकलं.