भारताचा दुसऱ्या टी-२० मध्ये दणदणीत विजय, सिरीजही जिंकली

भारतीय टीमची शानदार कामगिरी...

Updated: Dec 6, 2020, 05:41 PM IST
भारताचा दुसऱ्या टी-२० मध्ये दणदणीत विजय, सिरीजही जिंकली

सिडनी : भारत आणि यजमान ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेचा दुसरा सामना भारताने जिंकला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 195 धावांचे लक्ष्य दिले होते. भारताने १९.४ ओव्हरमध्ये हे लक्ष्य पूर्ण केले. भारताने ६ विकेटने दुसरी टी-२० जिंकली आहे. भारताचा हा लागोपाठी टी-२० मालिकेतील दुसरा विजय आहे. यासाह भारताने मालिका ही जिंकली आहे. या मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी खेळला जाणार आहे.

भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकत आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाच्या संघाने आधी बॅटींग करत १९४ रन केले. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार मॅथ्यू वेडने अर्धशतक ठोकलं. तिसऱ्या सामन्यात भारताने रवींद्र जडेजाच्या जागी युजवेंद्र चहलला संघात घेतलं होतं. तर मोहम्मद शमीच्या जागी शार्दुल ठाकुर आणि मनीष पांडेच्या जागी श्रेयस अय्यरला संधी देण्यात आली होती. 

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंच दुखापतीमुळे खेळू शकला नाही. जोश हेजलवुडला देखील विश्रांती दिली गेली. फिंचच्या जागी मार्कस स्टोइनिस आणि हेजलवुडच्या जागी डॅनियल सॅम्सला संधी दिली गेली होती. मिचेल स्टार्कच्या जागी एंड्रयू टायला संघात जागा मिळाली होती.

भारताकडून केएल राहुलने ३०, शिखर धवनने ५२, विराट कोहलीने ४० आणि संजू सॅमसनने १५ रन केले. तर हार्दिक पांड्याने २२ बॉलमध्ये नाबाद ४२ रन आणि श्रेयस अय्यरने ५ बॉलमध्ये १२ रन केले. भारताकडून टी नटराजने याने २ विकेट तर शार्दुल ठाकूर आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी १ विकेट घेतली.  

ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने ४६ रन, मॅक्सवेलने २२ रन, मोईसेस हेनरिक्सने २६ रन, स्टोईनिसने १६ रन केले.