INDvsAUS: T20 मध्ये विराट सेना तोडू शकते हे ऎतिहासिक रेकॉर्ड्स

ऑस्ट्रेलिया विरूद्ध वनडे सीरिजवर कब्जा केल्यानंतर टीम इंडिया आता टी-२० मध्ये धमाका करण्यास सज्ज आहे.

Updated: Oct 6, 2017, 02:44 PM IST
INDvsAUS: T20 मध्ये विराट सेना तोडू शकते हे ऎतिहासिक रेकॉर्ड्स title=

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरूद्ध वनडे सीरिजवर कब्जा केल्यानंतर टीम इंडिया आता टी-२० मध्ये धमाका करण्यास सज्ज आहे.

झारखंडच्या जीएससीए मैदानावर भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-२० सामना होणार आहे. ४० हजार दर्शकांची क्षमता असलेल्या या मैदानात टीम इंडियाने एक टेस्ट, चार वनडे आणि एक टी-२० सामने खेळले आहेत. यातील केवळ एकाच सामन्यात न्यूझीलंडच्या हातून टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. 

टीम इंडियातील खेळाडूंचा फॉर्म पाहता या टी-२० सीरिजमध्ये सिक्सर आणि फोरची बरसात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. ७ ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या टी-२० सीरिजमध्ये दोन्ही टीम तीनदा आमनेसामने येतील. या सामन्यांमध्ये प्रेक्षकांचं मोठं मनोरंजन होणार आहे. या सीरिजमध्ये अनेक मोठे रेकॉर्ड्स तुटण्याची आशा केली जात आहे. 

युवराजचा ऎतिहासिक रेकॉर्ड -

या रेकॉर्ड्समध्ये सर्वातआधी तूफानी बॅट्समन युवराज सिंह याचा रेकॉर्ड येतो. त्याने एका ओव्हरमध्ये ६ सिक्सर लगावत टी-२० मध्ये इतिहास रचला होता. २००७ मध्ये टी-२० वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंहने इंग्लंड विरूद्ध डरबनमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात ६ बॉलवर ६ सिक्सर लगावले होते. हा कारनामा पुन्हा एकदा या सीरिजमध्ये बघायला मिळेल, अशी अपेक्षा केली जात आहे. 

फिंचची तूफानी बॅटींग -

एका खेळीत १५० पेक्षा जास्त रन्स करण्याचा रेकॉर्ड एरॉन फिंचच्या नावावर आहे. त्याने टी-२० मध्ये २०१३ मध्ये ६३ बॉल्समध्ये १५३ रन्स केले होते. टी-२० इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ही सर्वात मोठी खेळी आहे. फिंचने त्याच्या या ऎतिहासिक खेळीत १४ सिक्सर आणि ११ फोर लगावले होते. 

अजंताची मिस्ट्री -

श्रीलंकेचा मिस्ट्री स्पिनर अजंता मेंडिसचा ८ रन्स देऊन ६ विकेट घेण्याचा रेकॉर्डही अजून कुणी तोडू शकलेलं नाहीये. मेंडिसने २०१२ मध्ये खेळल्या गेलेल्या वर्ल्ड टी-२० मध्ये झिम्बाब्वे विरूद्ध केवळ ८ रन्स देऊन ६ विकेट घेतल्या होत्या. हे टी-२० च्या इतिहासातील सर्वात चांगलं प्रदर्शन आहे.