close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

लोकेश राहुलनं मोडला राहुल द्रविडचा रेकॉर्ड

भारताचा ओपनिंग बॅट्समन लोकेश राहुल इंग्लंड दौऱ्यात खराब फॉर्ममध्ये आहे.

Updated: Sep 11, 2018, 04:16 PM IST
लोकेश राहुलनं मोडला राहुल द्रविडचा रेकॉर्ड

लंडन :  भारताचा ओपनिंग बॅट्समन लोकेश राहुल इंग्लंड दौऱ्यात खराब फॉर्ममध्ये आहे. शेवटच्या टेस्ट मॅचच्या शेवटच्या इनिंगमध्ये लोकेश राहुलला अखेर या सीरिजमधलं पहिलं अर्धशतक झळकावता आलं. असं असलं तरी लोकेश राहुलनं एक विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे. लोकेश राहुलनं राहुल द्रविडचा विक्रम मोडला आहे. या सीरिजमध्ये राहुलनं १४ कॅच पकडले आहेत.

द्रविडनं २००४ साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजमध्ये १३ कॅच पकडले होते. एकनाथ सोलकर यांनी १९७२-७३ मध्ये इंग्लंडविरुद्ध १२ कॅच पकडले होते. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक कॅच पकडण्याचा रेकॉर्ड राहुल द्रविडच्याच नावावर आहे. द्रविडनं १६४ टेस्ट मॅचमध्ये २१० कॅच पकडले आहेत. श्रीलंकेचा महेला जयवर्धने या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जयवर्धनेनं १४९ मॅचमध्ये २०५ कॅच घेतले होते.