टी-२० विजयानंतर आता टीम इंडिया वनडेसाठी तयार, ४ खेळाडू बदलणार

वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० सीरिजमध्ये भारताचा ३-०ने विजय झाला.

Updated: Aug 7, 2019, 06:23 PM IST
टी-२० विजयानंतर आता टीम इंडिया वनडेसाठी तयार, ४ खेळाडू बदलणार title=

गयाना : वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० सीरिजमध्ये भारताचा ३-०ने विजय झाला. यानंतर आता गुरुवारपासून ३ वनडे मॅचच्या सीरिजला सुरुवात होणार आहे. टी-२० आणि वनडे टीममध्ये काही बदल आहेत. टी-२० टीममध्ये असलेले दीपक चहर, राहुल चहर, वॉशिंग्टन सुंदर आणि कृणाल पांड्या वनडे टीममध्ये नाहीत.

वनडेच्या टीममध्ये युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, केदार जाधव आणि मोहम्मद शमी यांचं आगमन होणार आहे. तर वेस्ट इंडिजच्या टीममध्येही काही बदल आहेत. वनडेमध्ये वेस्ट इंडिजचं नेतृत्व जेसन होल्डरकडे आहे. तर कायरन पोलार्ड वनडे टीममध्ये नाही. रोस्टन चेस, क्रिस गेल, केमार रोच आणि शाय होप हे टीममध्ये पुनरागमन करतील.

वनडे सीरिजमध्ये टीम इंडिया जुन्या चुका सुधारायचा प्रयत्न करेल. यात चौथ्या क्रमांकाचा बॅट्समन ही सगळ्यात मोठी अडचण आहे. वर्ल्ड कपमध्येही टीम इंडियाला या समस्येनं भेडसावलं होतं. चौथ्या क्रमांकासाठी टीम इंडियाकडे श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत आणि केदार जाधव हे पर्याय आहेत. पंतने शेवटच्या टी-२० मॅचमध्ये अर्धशतक केलं होतं, त्यामुळे पंतचा चौथ्या क्रमांकावर विचार होऊ शकतो. वर्ल्ड कपच्या शेवटच्या काही मॅचमध्येही पंत चौथ्या क्रमांकावरच खेळला होता.

कमकूवत असलेली मधली फळी हीदेखील टीम इंडियाची समस्या आहे. या सीरिजमध्ये धोनी आणि हार्दिक पांड्याही टीमसोबत नाहीत. त्यामुळे अय्यर, पांडे आणि जाधव यांच्याकडे मधल्या फळीत स्वत:ला सिद्ध करण्याची संधी आहे. मनिष पांडेने टी-२० सीरिजमध्ये निराशाजनक कामगिरी केली. त्यामुळे त्याच्याऐवजी श्रेयस अय्यरला संधी दिली जाऊ शकते.

बॉलिंगमध्ये चहल किंवा कुलदीपपैकी कोणाला संधी द्यायची? ही कोहलीसाठी डोकेदुखी ठरू शकते. रवींद्र जडेजाचं खेळणं जवळपास निश्चित आहे. तर फास्ट बॉलिंगमध्ये कोहली भुवनेश्वर, सैनी आणि शमी यांना संधी देऊ शकतो.

भारतीय टीम

विराट कोहली, (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, ऋषभ पंत, मनिष पांडे, श्रेयस अय्यर, केदार जाधव, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, खलील अहमद, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, नवदीप सैनी

वेस्ट इंडिजची टीम

जेसन होल्डर (कर्णधार), रोहित शर्मा, क्रिस गेल, एव्हिन लुईस, जॉन कॅम्पवेल, शिमरन हेटमायर, निकोलास पूरन, शाय होप, रोस्टन चेस, कार्लोस ब्रॅथवेट, फेबियन एलन, कीमो पॉल, शेल्डन कॉट्रेल, केमार रोच, ओशेन थॉमस