बाहुबलीतील या अभिनेत्रीने केला खुलासा, IPLमध्ये या टीमचं करणार समर्थन

आयपीएल ११ चा शानदार उद्घाटन सोहळा मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यात बॉलिवूडचे अनेक सेलेब्रिटी सादरीकरण करणार आहेत. यामध्ये बाहुबली फेम अभिनेत्री तमन्ना भाटियाचाही समावेश आहे. आयपीएल उद्घाटन सोहळ्यात सादरीकरण करण्यास खूपच उत्सुक असल्याचं तमन्ना भाटियाने म्हटलं आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Apr 7, 2018, 05:58 PM IST
बाहुबलीतील या अभिनेत्रीने केला खुलासा, IPLमध्ये या टीमचं करणार समर्थन
File Photo

मुंबई : आयपीएल ११ चा शानदार उद्घाटन सोहळा मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यात बॉलिवूडचे अनेक सेलेब्रिटी सादरीकरण करणार आहेत. यामध्ये बाहुबली फेम अभिनेत्री तमन्ना भाटियाचाही समावेश आहे. आयपीएल उद्घाटन सोहळ्यात सादरीकरण करण्यास खूपच उत्सुक असल्याचं तमन्ना भाटियाने म्हटलं आहे.

सादरीकरणासाठी तमन्ना उत्सुक

आयपीएल उद्घाटन सोहळ्यात सादरीकरण करण्यासाठी अभिनेत्री तमन्ना भाटियाने शुक्रवारी अंतिम सराव केला. यावेळी तमन्ना भाटियाने पत्रकारांना आपली प्रतिक्रिया दिली.

अनेक इव्हेंट्स केले मात्र...

तमन्नाने प्रतिक्रिया देताना म्हटलं की, "आतापर्यंत मी अनेक शोज, इव्हेंट्स केले आहेत. मात्र, मी कधी स्पोर्ट्स इव्हेंट केला नाहीये. जेव्हा तुम्ही स्टेजवर असता त्यावेळी भीती आणि उत्साह दोन्ही असतात. एका कलाकाराच्या रुपात स्टेडिअममध्ये सादरीकरणं करणं आणि दर्शकांचा उत्साह हे पूर्णपणे वेगळं असतं."

IPL 2018, Tamanna Bhatia,

तमन्ना 'या' खेळाडूची चाहती

आयपीएलमध्ये कुठल्या टीमचं समर्थन करणार? या प्रश्नावर बाहुबली फेम अभिनेत्री तमन्नाने म्हटलं, "चेन्नई सुपर किंग्स (CSK) दोन वर्षांनंतर पुनरागमन करत आहे. ही धोनीची टीम असून मी त्याची मोठी चाहती आहे आणि त्यामुळे मी त्याला खेळताना पाहण्यासू खूपच उत्सुक आहे."

MS Dhoni, Tamanna Bhatia,

तमन्ना व्यतिरिक्त अभिनेता ह्रतिक रोशन, जॅकलिन फर्नांडिस आणि वरुण धवनही आयपीएल उद्घाटन सोहळ्यात सहभागी होणार आहेत.