आयपीएल २०१९ : मुंबईच्या सामन्यांचं संपूर्ण वेळापत्रक

आयपीएलच्या १२व्या मोसमासाठीच्या वेळापत्रकाची अखेर घोषणा करण्यात आली आहे.

Updated: Mar 19, 2019, 07:45 PM IST
आयपीएल २०१९ : मुंबईच्या सामन्यांचं संपूर्ण वेळापत्रक title=

मुंबई : आयपीएलच्या १२व्या मोसमासाठीच्या वेळापत्रकाची अखेर घोषणा करण्यात आली आहे. आयपीएलच्या सगळ्या टीम घरच्या मैदानात ७ सामने आणि बाहेर ७ सामने खेळणार आहे. दरवर्षी प्रमाणेच यावर्षीचंही वेळापत्रक आहे. लोकसभा निवडणुकीमुळे याआधी आयपीएलच्या सुरुवातीच्या २ आठवड्यांचं वेळापत्रकच घोषित करण्यात आलं होतं. यामुळे उरलेल्या सामने टीमना त्यांच्या घरच्या मैदानात खेळता येणार नाहीत, असा अंदाज होता. पण बीसीसीआयने मात्र आयपीएलच्या वेळापत्रकात कोणताही बदल केलेला नाही.

या मोसमामध्ये मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा ओपनिंगला खेळणार आहे. मुंबईच्या पत्रकार परिषदेमध्ये रोहित शर्माने याची घोषणा केली आहे. मागच्या काही वर्षांपासून मुंबईकडून खेळताना रोहित शर्मा हा चौथ्या क्रमांकावर बॅटिंग करायचा. या निर्णयावर अनेक दिग्गज खेळाडू आणि क्रिकेट समिक्षक आणि चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसंच रोहितने ओपनिंगलाच खेळावं, अशी मागणी होत होती. अखेर रोहित शर्माने यंदाच्या मोसमात ओपनिंगला खेळण्याचा निर्णय घेतला.

मुंबईच्या मॅचचं वेळापत्रक 

मुंबईतले सामने 

२४ मार्च : मुंबई विरुद्ध दिल्ली, मुंबई

३ एप्रिल : मुंबई विरुद्ध चेन्नई, मुंबई 

१० एप्रिल : मुंबई विरुद्ध पंजाब, मुंबई 

१३ एप्रिल : मुंबई विरुद्ध राजस्थान, मुंबई

१५ एप्रिल : मुंबई विरुद्ध बंगळुरू, मुंबई

२ मे : मुंबई विरुद्ध हैदराबाद, मुंबई

५ मे : मुंबई विरुद्ध कोलकाता, मुंबई

मुंबईबाहेरचे सामने

२८ मार्च : बंगळुरू विरुद्ध मुंबई, बंगळुरू

३० मार्च : पंजाब विरुद्ध मुंबई, मोहाली

६ एप्रिल : हैदराबाद विरुद्ध मुंबई, हैदराबाद

१८ एप्रिल : दिल्ली विरुद्ध मुंबई, दिल्ली

२० एप्रिल :  राजस्थान विरुद्ध मुंबई, जयपूर 

२६ एप्रिल : चेन्नई विरुद्ध मुंबई, चेन्नई

२८ एप्रिल : कोलकाता विरुद्ध मुंबई, कोलकाता

मुंबईची टीम

रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या, इशान किशन, सूर्यकुमार यादव, मयांक मार्कंडे, राहुल चहर, अनुकूल रॉय, सिद्धेश लाड, आदित्य तरे, क्विंटन डी कॉक, कायरन पोलार्ड, बेन कटिंग, मिचेल मॅकलेनघन, ऍडम मिलन, जेसन बेहरेनड्रॉफ, युवराज सिंह, लसिथ मलिंगा, अनमोलप्रीत सिंह, बरिंदर सरन, पंकज जासवाल, राशिख सलाम

मुंबई इंडियन्सची टीम आत्तापर्यंतच्या ११ आयपीएलपैकी ३ आयपीएल जिंकली. सर्वाधिक आयपीएल जिंकण्याचं रेकॉर्ड सध्या मुंबई आणि धोनीच्या चेन्नईच्या नावावर आहे. मुंबई इंडियन्सनं आत्तापर्यंत २०१३, २०१५ आणि २०१७ सालची आयपीएल जिंकली. मागच्या वर्षीच्या आयपीएलमध्ये मात्र मुंबईची कामगिरी निराशाजनक झाली. मागच्या मोसमामध्ये मुंबईला प्ले ऑफमध्येही पोहोचता आलं नव्हतं. मागच्या मोसमामध्ये निराशाजनक कामगिरी केलेल्या मुंबईच्या टीमला यावर्षी त्यांचा खेळ सुधारण्याचं आव्हान असेल. 

आयपीएल २०१९ : संपूर्ण वेळापत्रक