close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

IPL 2019: रोहितशिवाय मुंबई मैदानात, पोलार्डकडे कर्णधारपद

पंजाबविरुद्धची मॅच सुरु होण्याआधीच मुंबईला मोठा धक्का लागला आहे.

Updated: Apr 10, 2019, 07:54 PM IST
IPL 2019: रोहितशिवाय मुंबई मैदानात, पोलार्डकडे कर्णधारपद

मुंबई : पंजाबविरुद्धची मॅच सुरु होण्याआधीच मुंबईला मोठा धक्का लागला आहे. दुखापतीमुळे रोहित शर्मा ही मॅच खेळू शकणार नाही. रोहित शर्माऐवजी पोलार्डकडे मुंबईचं कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. रोहित शर्माऐवजी सिद्धेश लाडची मुंबईच्या टीममध्ये निवड झाली आहे. सिद्धेश लाडची ही पहिलीच मॅच आहे. मॅच सुरु होण्याच्या आधी रोहितने सिद्धेश लाडला मुंबईची कॅप देण्यात आली. या मॅचमध्ये मुंबईने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.

याआधी पंजाबच्या मोहालीमध्ये झालेल्या मॅचमध्ये मुंबईचा पराभव झाला होता. आता या पराभवाचा बदला घेण्यासाठी मुंबईची टीम मैदानात उतरेल.

हैदराबादविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईचा विजय झाला होता. अल्झारी जोसेफ हा मुंबईच्या विजयाचा शिल्पकार ठरला होता. अल्झारी जोसेफनं १२ रन देऊन ६ विकेट घेतल्या होत्या. आत्तापर्यंतच्या सगळ्या आयपीएल मोसमातली ही सर्वोत्तम कामगिरी होती.

पॉईंट्स टेबलवर नजर टाकली तर पंजाबची टीम सध्या ८ पॉईंटसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. पंजाबनं आत्तापर्यंत खेळलेल्या ६ मॅचपैकी ४ मॅच जिंकल्या आहेत, तर २ मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. दुसरीकडे मुंबईची टीम ६ पॉईंटसह पाचव्या क्रमांकावर आहे. मुंबईने खेळलेल्या ५ मॅचपैकी ३ मॅच जिंकल्या आणि २ मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला.

मुंबईची टीम

क्विंटन डीकॉक, सिद्धेश लाड, सूर्यकुमार यादव, इशान किशन, कृणाल पांड्या, कायरन पोलार्ड (कर्णधार), हार्दिक पांड्या, राहुल चहर, अल्झारी जोसेफ, जेसन बेहरनडॉर्फ, जसप्रीत बुमराह

पंजाबची टीम

केएल राहुल, क्रिस गेल, करुण नायर, सरफराज खान, डेव्हिड मिलर, मनदीप सिंग, रवीचंद्रन अश्विन (कर्णधार), सॅम करन, हार्डस विलजोएन, मोहम्मद शमी, अंकीत राजपूत

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा