बंगळुरु : राजस्थान विरुद्ध बंगळुरु यांच्यातील सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करावा लागला. प्ले-ऑफच्या दृष्टीने हा सामना महत्वाचा होता. हीच बाब लक्षात घेत ५ ओव्हर मॅच खेळवण्यात आली. जेणेकरुन मॅच निकालात निघावी. परंतु पावसापुढे सामना रद्द करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे राजस्थान आणि बंगळुरुला प्रत्येकी १-१ पॉईंट देण्यात आला. दरम्यान या ५ ओव्हरमध्ये देखील राजस्थानच्या श्रेयस गोपाळ उल्लेखनीय कामगिरी केली. या सामन्यात त्याने हॅटट्रिक घेतली.
पहिल्या डावात राजस्थानकडून बॉलिंग करताना श्रेयस गोपाळने हॅटट्रिक घेतली. त्याने विराट कोहली, एबी डिव्हीलियर्स आणि मार्क्स स्टोनिसला बाहेरचा रस्ता दाखवला. त्याने मॅचच्या दुसऱ्या ओव्हरमध्येच शेवटच्या तीन बॉलमध्ये हॅटट्रिक घेतली. त्याने टाकलेल्या १ ओव्हरमध्ये १२ रन दिल्या.
HAT-TRICKKKKKKKKKKKKKKKKKKKKKKKKKKK
Kohli
ABD
Stoinis @ShreyasGopal19 you are an absolute beauty! #RR #RCBvRR #HallaBol pic.twitter.com/3vSkhGbJDx— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 30, 2019
श्रेयस गोपाळने विराट कोहली आणि एबी डिव्हिलिर्सला आऊट करत रेकॉर्ड केला. या दोघांना श्रेयसने आऊट करण्याची ही तिसरी वेळ होती. राजस्थानकडून हॅट्रिक घेणारा तो चौथा आणि आयपीएल इतिहासातील १९ वा खेळाडू ठरला आहे.
राजस्थानकडून सर्वात आधी अजित चंडेलाने हॅटट्रिक घेतली होती. त्याने पुण्याच्या विरुद्धात २०१२ साली हॅटट्रिक घेण्याची कामगिरी केली होती. यानंतर २०१४ साली राजस्थानच्या प्रवीण तांबे आणि शेन वॉटसन या दोघांनी हॅटट्रिक घेतली होती. प्रवीण तांबेने कोलकाता तर वॉटसनने हैदराबाद विरुद्ध हॅटट्रिक घेण्याची किमया केली होती.
बंगळुरुने राजस्थानला विजयासाठी ५ ओव्हरमध्ये ६३ रनचे आव्हान दिले होते. राजस्थानने ३.२ ओव्हरमध्ये १ विकेट गमावून ४१ रन केल्या. पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवावा लागला. राजस्थानकडून सर्वाधिक २८ रन संजू सॅमसनने केल्या.
याआधी टॉस जिंकून राजस्थानने बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. बंगळुरुने निर्धारित ५ ओव्हरमध्ये ७ विकेट गमावून ६२ रन केल्या. यात कॅप्टन विराट कोहलीने ७ बॉलमध्ये २५ रनची तडाखेदार खेळी केली. यात १ फोर आणि ३ सिक्सचा समावेश होता. राजस्थानकडून श्रेयस गोपाळने ३ तर ओशेन थॉमसने २ आणि रियान पराग आणि जयदेव उनाडकटने प्रत्येकी १-१ विकेट घेतली.