दुबई : आयपीएल 2020 च्या 52 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला सनरायझर्स हैदराबादकडून 5 विकेटने पराभव स्वीकारावा लागला. बंगळुरू संघाचा हा सलग तिसरा पराभव आहे आणि आता या संघाला प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी शेवटच्या सामन्यात विजय मिळवावा लागेल. टीमच्या सतत झालेल्या पराभवामुळे एबी डेव्हिलियर्स खूपच दु:खी दिसला आणि म्हणाला की, टीम दिल्लीविरुद्ध जबरदस्त पुनरागमन करेल.
हैदराबादविरुद्ध 24 धावा करणारा एबी डिव्हिलियर्स या सामन्यानंतर म्हणाला की, 'सलग तीन सामने गमवणं ही एक भितीदायक भावना आहे. परंतु हे या स्पर्धेचे स्वरुप आहे. येथे काहीही होऊ शकते. आपण तीन सामने गमवल्यानंतर आपण सलग तीन सामने जिंकूही शकता. दिल्लीविरूद्धच्या सामन्याबद्दल डिव्हिलियर्स म्हणाला, 'दिल्लीविरुद्धचा सामना आता खूप महत्वाचा झाला आहे आणि हे आपल्या सर्वांना माहित आहे. आम्हाला सर्वोत्कृष्ट क्रिकेट खेळावे लागेल.'
डिव्हिलियर्स म्हणाला की, माझं आणि जोशचं सलग आऊट होणं हा सामन्यातील टर्निंग पॉईंट होता. यामुळे आमच्या 20 ते 30 धावा कमी झाल्या. स्कोअर पुरेशी नव्हती. दुसर्या डावात, दवचा प्रभाव स्पष्ट दिसत होता.