IPL 2020: बंगळुरुचा चेन्नईवर 37 रनने विजय

आरसीबीने या टुर्नामेंटमध्ये चौथा विजय मिळवला आहे. 

Updated: Oct 11, 2020, 12:08 AM IST
IPL 2020: बंगळुरुचा चेन्नईवर 37 रनने विजय

दुबई : विराट कोहलीच्या नेतृत्वातील बंगळुरुच्या संघाने चेन्नई टीमचा 37 रनने पराभव केला आहे. शनिवारी झालेल्या या आयपीएलच्या 25 व्या सामन्यात चेन्नईला पुन्हा पराभवाचा सामना करावा लागला. आरसीबीने या टुर्नामेंटमध्ये चौथा विजय मिळवला आहे. 

बंगळुरुने सीएसकेला 170 रनचं आव्हान दिलं होतं. सीएसकेची टीम 20 ओव्हरमध्ये 132-8 रन करु शकली. कर्णधार विराट कोहलीने नाबाद 90 रनची खेळी केली. क्रिस मॉरिसने 3 विकेट घेतले.

कोहली ठरला मॅन ऑफ द मॅच

चेन्नई सुपर किंग्जच्या विरुद्ध 52 बॉलमध्ये नाबाद 90 रनची विस्फोटक खेळी करणारा विराट कोहली मॅन ऑफ द मॅच ठरला. विराट कोहलीची टीम चौथ्या स्थानावर पोहोचली आहे.