IPL 2021 | कार्तिक त्यागीची गेमचेंजर ओव्हर, पंजाबला शेवटच्या षटकात असं नमवलं, बघा...

कार्तिक त्यागीने (Kartik Tyagi Sensational Over) टाकलेल्या निर्णायक 20 व्या ओव्हरमुळे राजस्थानचा सनसनाटी विजय झाला. 

Updated: Sep 22, 2021, 03:21 PM IST
 IPL 2021 | कार्तिक त्यागीची गेमचेंजर ओव्हर, पंजाबला शेवटच्या षटकात असं नमवलं, बघा...

यूएई : आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021) रंगतदार झालेल्या 32 वा सामन्यात (IPL 2021 32nd Match Result) राजस्थानने (Rajasthan Royals) पंजाबवर (PBKS) थरारक विजय मिळवला. राजस्थानने या विजयासह 14 व्या पर्वातील 4 थ्या विजयाची नोंद केली. कार्तिक त्यागीने (Kartik Tyagi Sensational Over) टाकलेल्या निर्णायक 20 व्या ओव्हरमुळे राजस्थानचा सनसनाटी विजय झाला. कार्तिक या विजयाचा शिल्पकार ठरला. (ipl 2021 32nd match punjab vs rajsthan royals kartik tyagi sensational last over win by 2 runs at Dubai cricket stadium)

कार्तिकने शेवटच्या 20 ओव्हरमध्ये 4 धावांचा यशस्वीपणे बचाव केला. सोबतच त्याने या ओव्हरमध्ये केवळ 1 धाव देत 2 विकेट्स पटकावल्या. त्यागीच्या भेदक माऱ्यामुळे पंजाबचा हाता तोडांशी आलेला विजयाचा घास हिरावला गेला. 
 
असा रंगला शेवटच्या ओव्हरमधील थरार

राजस्थानने निर्धारित 20 ओव्हरमध्ये ऑलआऊट 185 रन्स केल्या. त्यामुळे पंजाबला विजयासाठी 186 धावांचे आव्हान मिळाले. पंजाबची शानदार सुरुवात झाली. कर्णधार केएल राहुल आणि मयंक अगरवाल या सलामी जोडीने 120 धावांची भागीदारी केली. या दोघांच्या भागीदारीमुळे पंजाबची जबरदस्त सुरुवात झाली. 

या सलामी जोडीच्या भागीदारीच्या जोरावर आणि तिसऱ्या चौथ्या क्रमांकावरील फलंदाजांमुळे पंजाबला शेवटच्या ओव्हरमध्ये 4 धावांची गरज होती. पंजाबचा विजय सहज वाटत होता.  

या निर्णायक क्षणी कॅप्टन संजू सॅमसनने कार्तिक त्यागीला ओव्हर टाकायला दिली. मैदानात एडेन मकरम आणि निकोलस पूरन सेट जोडी मैदानात होती. विजयासाठी फक्त 1 फोरची गरज होती. पण या कार्तिकने पंजाबचा गेम केला.  

कार्तिकने 20 व्या ओव्हरमधील पहिला बॉल डॉट टाकला. दुसऱ्या बॉलवर मकरमने एक धाव घेतली. स्ट्राईकवर निकोलस पूरन आला. या पूरनला त्यागीने मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. कार्तिकने पूरनला विकेटकीपर संजू सॅमसनच्या हाती कॅच आऊट केलं.  

यानंतरही पंजाबला 3 चेंडूत 3 धावांची गरज होती. त्यागीने चौथा चेंडूही डॉट फेकला. आता 2 बॉल 3 रन्स हवे होते. पंजाबच्या डग आऊटमध्ये असलेल्या खेळाडू आणि चाहत्यांची धाकधूक वाढली.

त्यागीने 5 व्या चेंडूवर कमाल केली. दीपक हुड्डाला दुसऱ्याच चेंडूवर शून्यावर आऊट केलं.  हुड्डाच्या रुपात पंजाबने चौथी विकेट गमावली. हुड्डानंतर फॅबिएन एलेन मैदानात आला. आता पंजाबला विनिंगसाठी 1 बॉलमध्ये हव्या होत्या3 रन्स. फॅबिएन स्ट्राईकवर होता.

विजयासाठी चौकार अपेक्षित होता. मात्र कार्तिकने हुशारीने परफेक्ट यॉर्कर टाकला. या चेंडूवर एलेनला काहीही करता आलं नाही. त्यामुळे अशा प्रकारे त्यागीने शानदार पद्धतीने 4 धावांचा बचाव करत राजस्थानला सनसनाटी विजय मिळवून दिला.

पाहा कार्तिक त्यागीने टाकलेली शेवटची ओव्हर