IPL 2021: मुंबईत वाढत्या कोरोनामुळे IPLचे सामने होणार की नाही?

IPL 2021 साठी पुढचे 48 तास महत्त्वाचे, BCCI चा निर्णय येण्याची शक्यता 

Updated: Apr 4, 2021, 03:03 PM IST
IPL 2021: मुंबईत वाढत्या कोरोनामुळे  IPLचे सामने होणार की नाही? title=

मुंबई: देशासह महाराष्ट्रात झपाट्यानं कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. IPL सुरू होण्यापूर्वी कोरोनाचं संकट वाढलं आहे. चेन्नई सुपर किंग्स, रॉयल चॅलेंज बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स संघापर्यंत कोरोना पोहोचला आहे. तर दुसरीकडे मुंबईत दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोनाचा फटका देखील बसला आहे. वानखेडे स्टेडियममध्ये मैदानाची देखरेख करणाऱ्या 10 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. या सगळ्यानंतर मुंबईत IPLचे सामने होणार की नाही याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत होते. मात्र BCCI ने यावर उत्तर दिलं आहे.

BCCIच्या अधिकाऱ्यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार या सगळ्या प्रश्नांना पूर्णविराम दिला आहे. IPLच्या स्पर्धा मुंबईतच होणार आहेत. मुंबईत 14 ते 25 एप्रिलदरम्यान 10 सामने खेळवले जाणार आहेत. मुंबईतून हे सामने दुसरीकडे खेळवणं सध्या शक्य नाही आणि तेवढा वेळही हातात नाही अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

हैदराबाद हा पर्याय BCCIकडे बॅकअपसाठी आहे. मात्र खेळाडूंच्या आरोग्याच्या दृष्टीनं सगळंच एका शहरातून दुसऱ्या शहरात शिफ्ट करण्याचं आव्हान आहे. खूप मोठी जोखीम आहे मात्र सध्यातरी हा पर्यायच आहे. याबाबत कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आला नाही. 

याशिवाय BCCI अधिक कठोर नियमावली करू शकते. ज्यामध्ये रोज कोरोना चाचणी अनिवार्य असेल. सध्या 3 दिवसातून एकदा कोरोना चाचणी होत आहे. 

ग्राऊड स्टाफसाठी वेगळी सुविधा बायो बबल ठेवण्याचा निर्णय घेण्यात येऊ शकतो. याशिवाय अधिक सुरक्षा आणि नियम कडक केले जाण्याची शक्यता आहे. 

अक्षर पटेल, CSK संघातील एकाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर RCB संघाचा सलामीवीर देखील कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. येत्या 48 तासांत परिस्थिती आणखी गंभीर झाली तर सामन्यांवर निर्णय घेतला जाण्याची शक्यता सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र सध्या तरी BCCI देखील वेट अॅण्ड वॉचच्या भूमिकेत आहे. 

Tags: