मुंबई: चेन्नई विरुद्ध झालेल्या सामन्यात कोलकाता संघाला 18 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासोबत संघाचा कर्णधार इयोन मॉर्गनला देखील मोठा धक्का बसला आहे. याचं कारण म्हणजे सामना तर हातातून गेलाच पण पैसेही गेले आहेत. सामन्यानंतर कोलकाता कर्णधार इयोन मॉर्गनला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
सर्वात पहिल्यांदा हा दंड चेन्नई सुपरकिंग्स संघासाठी ठोठावण्यात आला होता. त्यानंतर मुंबई इंडियन्स आणि आता कोलकाता संघाचा कर्णधार इयोन मॉर्गनला हा दंड भरावा लागला आहे.
चेन्नई सुपरकिंग्स संघ फलंदाजी करत असताना कोलकाता संघातील गोलंदाजाने स्लो ओव्हर रेटनं गोलंदाजी केल्यानं त्याचा फलटका संघाला बसला आहे. IPLमधील आचार संहितेचं उल्लंघन केल्याप्रकरण कोलकाता संघाचा कर्णधार इयोन मॉर्गनला हा दंड भरावा लागला आहे.
एका संघाला 90 मिनिटांमध्ये आपले 20 ओव्हर पूर्ण करायचे आहेत. यामध्ये 85 मिनिटांत एक डाव संपवला जाईल तर 2.5 मिनिटं प्रत्येक संघाला स्ट्रॅटजिक टाइम आऊट देण्यात आला आहे. सुपरओव्हर देखील 90 मिनिटांत संपवणं अपेक्षित आहे. या नव्या नियमानुसार कर्णधार इयोन मॉर्गला स्लो ओव्हर रेटसाठी हा दंड आकारण्यात आला आहे.
चेन्नई सुपरकिंग्स संघाने 221 धावांचं टार्गेट कोलकाता संघाला दिलं. मात्र फलंदाजांची पहिला फळी डळमळीत झाली. तरी दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल आणि पॅट या तिघांनी मिळून 202 धावा केल्या. 18 धावांनी कमी पडल्यानं कोलकाता संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
आतापर्यंत कोलकाता आणि चेन्नई प्रत्येकी 4 सामने खेळलं आहे. त्यापैकी कोलकाता संघ केवळ एकच सामना जिंकलं आहे. तर चेन्नई सुपरकिंग्स संघ 3 सामने जिंकलं आहे.