IPL 2021 CSK vs KKR: 'थाला'नं बदलला इतिहास! पहिल्यांदाच महेंद्रसिंह धोनीला जमली 'ही' गोष्ट

अशी कोणती गोष्ट आहे जी गेल्या काही वर्षात चक्क माहीला जमली नाही. MS dhoniने कोणता इतिहास बदलला वाचा सविस्तर.

Updated: Apr 22, 2021, 08:17 AM IST
IPL 2021 CSK vs KKR: 'थाला'नं बदलला इतिहास! पहिल्यांदाच महेंद्रसिंह धोनीला जमली 'ही' गोष्ट title=

मुंबई: कोलकाता विरुद्ध झालेल्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्स संघाने 18 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासोबत CSKचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने इतिहास बदलला आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघातील बॉलर सुनील नरेन याच्या बॉलिंगवर धोनीनं चौकार ठोकला आहे. नरेनच्या 64 व्या बॉलवर चौकार मारला. पहिल्यांदाच नरेनच्या बॉलवर धोनीने मारलेल्या या चौकारानं इतिहास बदलला आहे. 

संपूर्ण टी 20 क्रिकेटमध्ये धीन आणि नरेन याआधी देखील बऱ्याच वेळा आमनेसामने आले आहेत. या आधी नरेननं 2 वेळा माहीला आऊट देखील केलं होतं. याआधी नरेनच्या बॉलवर पहिल्यांदा एकदाच चौकार ठोकण्याची संधी धोनीला 2013मध्ये मिळाली होती.  सुनील नरेननं टाकलेल्या 83 चेंडूचा सामना धोनीनं केला आहे. सुनीलने धोनीला 2 वेळा आऊट देखील केलं होतं.

2 ऑक्टोबर 2013मध्ये पहिल्यांदा धोनीने नरेनच्या बॉलवर चौकार मारला होता.त्यानंतर कोलकाता विरुद्ध झालेल्या सामन्यात धोनीनं नरेनच्या बॉलवर चौकार मारल्यानंतर सर्वांनाच पुन्हा एकदा आनंद झाला. धोनीनं 2 चौकार आणि 1 षटकार ठोकत 17 धावांची खेळी केली. त्यानंतर कॅच आऊट झाल्यामुळे धोनी तंबुत परतला. 

चेन्नई सुपकिंग्स संघाने 220 धावा करत कोलकाताला 221 धावांचं लक्ष्य दिलं होतं. ऋतुराज गायकवाडने 64 तर फाफ ड्युप्लेसिसने 95 धावांची खेळी केली. मोइन अलीनं 25, धोनी 17 तर जडेजानं 6 धावा केल्या. बॉलिंगचा विचार करायचा झाला तर दीपक चहर आणि लुंगी नगिदीने कोलकाताच्या फलंदाजांना घाम फुटला. दीपकने 4 तर लुंगी नगिदीने 3 विकेट्स घेतल्या.