IPL 2021 CSK vs MI: हैदराबाद पाठोपाठ चेन्नईच्या खेळाडूनं फोडला फ्रिज, व्हिडीओ

चेन्नई सुपर किंग्स संघातील अंबाती रायडूनं जबरदस्त खेळी केली आहे. त्याने जॉनी बेअरस्टोकसारखा जबरदस्त सिक्स ठोकला आहे. 

Updated: May 2, 2021, 12:00 PM IST
IPL 2021 CSK vs MI: हैदराबाद पाठोपाठ चेन्नईच्या खेळाडूनं फोडला फ्रिज, व्हिडीओ title=

मुंबई:  हैदराबाद संघातील खेळाडूनं सिक्स ठोकत डगआऊटमधील फ्रीजच्या काचा फोडल्या होत्या. तोच प्रकार पुन्हा एकदा चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघासोबत घडला आहे. चेन्नई संघातील अंबाती रायडूनं ठोकलेल्या सिक्समुळे काल दुसऱा फ्रीज फुटला आहे. 

चेन्नई सुपर किंग्स संघातील अंबाती रायडूनं जबरदस्त खेळी केली आहे. त्याने जॉनी बेअरस्टोकसारखा जबरदस्त सिक्स ठोकला आहे. 27 चेंडूमध्ये त्याने 72 धावा केल्या. 4 चौकार आणि 7 षटकार लगावले आहेत. अंबातीनं मारलेला सिक्स इतका वेगानं आणि जबरदस्त होता की फ्रीजची काच फुटली आणि तुकडे झाले. डगआऊटमध्ये मुंबई इंडियन्सचे बसलेले खेळाडू थोडक्यात वाचले आहेत. 

अंबाती रायडूनं फोडला फ्रीज, जबरदस्त सिक्सचा व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

मुंबई विरुद्ध सामन्यात चेन्नई संघाला पराभव स्वीकारावा लागला आहे. मुंबईच्या किरोन पोलार्डने विजय खेचून आणत मुंबईला विजय मिळवून दिला आणि चेन्नईचा पराभव झाला. अंबाती रायडूने अर्धशतकी खेळी केली आहे. 

अंबाती रायडूनं ठोकलेल्या 93 मीटर सिक्सचा व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्या दरम्यान जॉनी बेअरस्टोने देखील असाच भयानक सिक्स ठोकला होता. सिक्सने चक्कं कोल्ड्रिंक्स आणि पाणी ठेवलेल्या फ्रीजची काच फोडली. बेस्टोच्या सिक्सचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. 

या फ्रीजजवळ सनरायझर्स हैदराबादचे खेळाडू होते. हे खेळाडू थोडक्यासाठी वाचले. सुदैवानं त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पाहून अंदाज येईल की अक्षरश: फ्रीजच्या काचेचा चुरा झाला आहे.