IPL 2021: Lungi Ngidi च्या गुगलीवर विस्फोटक वॉर्नरनची विकेट, व्हीडिओ व्हायरल

बुधवारी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने आपला चांगला आणि स्फोटक खेळ दाखवला नाही.

Updated: Apr 29, 2021, 02:58 PM IST
IPL 2021: Lungi Ngidi च्या गुगलीवर विस्फोटक वॉर्नरनची विकेट, व्हीडिओ व्हायरल title=

मुंबई : बुधवारी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने आपला चांगला आणि स्फोटक खेळ दाखवला नाही, ज्यासाठी तो क्रिकेटमध्ये ओळखला जातो. तो खूप कमी आणि संथ गतीने खेळत होता. त्याच्याकडून मोठे शॅाट्स खूप कमी पाहायला मिळाले.

या सामन्यात डेव्हिड वॉर्नरने अतिशय धीमा खेळ दाखवला. त्याने 55 चेंडूत फक्त 57 धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजी दरम्यान डेव्हिड वॉर्नरला 18 व्या ओव्हरमध्ये पहिल्याच चेंडूवर लुंगी एनगीडीने आउट केले.

व्हिडीओ व्हायरल

डेव्हिड वॉर्नर आउट झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. लुंगी एनगीडीच्या चेंडूला वॉर्नरले अशा प्रकारे मारला की, तो चेंन्डू सगळ रवींद्र जडेजाच्या हातात येऊन पडला. तो व्हिडीओ पाहिलात तर तुम्हालाही असे वाटेल की, वॉर्नरने स्वत:हून ती कॅच जडेजाच्या हातात दिली. त्यामुळे सोशल मीडियावरती देखील लोकं डेव्हिड वॉर्नरला ट्रोल करत आहेत.

पराभवासाठी वॉर्नर स्वत:च जबाबदार

सनरायझर्स हैदराबादच्या पराभवासाठी कर्णधार डेव्हिड वॉर्नरला दोष देण्यात येत आहे. टी -20 क्रिकेटच्या बाबतीत सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने या सामन्यात अतिशय संथ खेळी खेळली. या पराभवाची जबाबदारी स्वीकारताना डेव्हिड वॉर्नरने कबूल केले की, त्याने अत्यंत संथ गतीने फलंदाजी केली.

वॉर्नरने फील्डरच्या जवळ शॉट्स खेळले

वॉर्नर सामन्यानंतर म्हणाला की, ''मी ज्या प्रकारे फलंदाजी केली त्यामुळे मी पराभवाची संपूर्ण जबाबदारी घेतो. मी खूप हळू फलंदाजी केली आणि फील्डरच्या जवळ शॉट्स खेळले. मनीषने शानदार फलंदाजी केली. केन विल्यमसन आणि केदार जाधव यांनी आम्हाला चांगली धावसंख्या मिळवून दिली. पण शेवटी मीच या खेळाचा शेवट चांगला करु शकलो नाही आणि या पराभवाची संपूर्ण जबाबदारी मी स्वीकारली."