पृथ्वी शॉचा घातक थ्रो...बॉल डोक्यात पडता पडता वाचला ऋषभ पंत, व्हिडीओ

 पंजाब संघाची बॅटिंग सुरू असताना पृथ्वी शॉने धोकादायक पद्धतीनं बॉल थ्रो केला.

Updated: May 3, 2021, 02:09 PM IST
पृथ्वी शॉचा घातक थ्रो...बॉल डोक्यात पडता पडता वाचला ऋषभ पंत, व्हिडीओ title=

मुंबई: पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स झालेल्या सामन्यात ऋषभ पंतच्या संघाने 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. या सामन्या दरम्यान एक प्रकार घडला आहे. पंजाब संघाची बॅटिंग सुरू असताना पृथ्वी शॉने धोकादायक पद्धतीनं बॉल थ्रो केला. त्यावेळी एक मजेशीर प्रकार घडला.

पृथ्वी शॉने फील्डिंगदरम्यान त्याच्याकडे आलेला बॉल घातक पद्धतीने बॉलरच्या दिशेनं फेकला. हा बॉल जवळपास पंतच्या डोक्यावरून गेला. मात्र पंतला ते पटकन कळलं नाही. तो डोक्याला हात लावून खाली पटकन खाली बसला. त्यामुळे बॉलचा टप्पा पुढे पडला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. 

पंजाब किंग्ज प्रथम फलंदाजीला आला. दिल्लीच्या गोलंदाजांनी पंजाबला धावा मिळण्यापासून रोखलं. सामन्याच्या दुसर्‍या ओव्हरमध्ये मार्कस स्टोईनिसच्या चेंडूवर मयंक अग्रवालने शॉट खेळला. फील्डिंग पृथ्वी शॉने जोरदार थ्रो मारला. बॉल विकेटकीपरकडे आला नाही. तो त्याला पकडता आला नाही ऋषभ पंत डोक्याला हात लावून खाली बसला. तर पृथ्वी शॉ हसत होता.