IPL 2021: माहीचा जबरदस्त फॅन, खेळाडूनं मैदानात घेतला MS Dhoniचा आशीर्वाद

IPLच्या सरावादरम्यान या फोटोनं सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

Updated: Mar 28, 2021, 06:00 PM IST
IPL 2021: माहीचा जबरदस्त फॅन, खेळाडूनं मैदानात घेतला MS Dhoniचा आशीर्वाद title=

मुंबई: अवघ्या काही दिवसांवर IPLच्या स्पर्धा येऊ ठेपल्या असताना आता सर्व संघांनी कंबर कसली आहे. IPLमध्ये जिंकण्यासाठी 8 संघांचा सध्या उत्तम सराव सुरू आहे. या सरावा दरम्यान CSKचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा एका फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

IPLची रणधुमाळी सुरू होण्याआधी या फोटोनं सोशल मीडियावर तुफान धुमाकूळ घातला आहे. या फोटोमध्ये पाहू शकता माही सराव करत असताना तिथे एक नेट सराव करणारा खेळाडू धोनीचा आशीर्वाद घेण्यासाठी आला. त्याचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

हा फोटो काही दिवसांपूर्वीचा असल्याचंही सांगितलं जात आहे. याचं कारण म्हणजे CSKचा कॅम्प सध्या मुंबईत आहे. CSK संघ मुंबईमध्ये IPLसाठी सराव करत आहे. त्यामुळे हा फोटो नेमका कधीचा आहे हे अद्याप नीट समजू शकलं नाही. सोशल मीडियावर हा फोटो खूप व्हायरल होत आहे. या फोटोला 4 हजारहून अधिक लाईक्स 500 हून अधिक कमेंट्स आणि रिट्वीट्स मिळाले आहेत.

Tags: