IPL 2021 सुरू होण्यापूर्वी वाचा मुंबई इंडियन्स संघाचं संपूर्ण शेड्युल

मुंबई इंडियान्स संघाचे सामना कधी आणि कुठे होणार आहेत त्यांचं शेड्युल कसं असणार जाणून घ्या

Updated: Apr 3, 2021, 09:00 AM IST
IPL 2021 सुरू होण्यापूर्वी वाचा मुंबई इंडियन्स संघाचं संपूर्ण शेड्युल title=

मुंबई: IPL सुरू होण्यासाठी केवळ एक आठवडा बाकी आहे. 9 एप्रिलपासून 6 शहरांमध्ये 8 संघांमध्ये IPL चे सामने रंगणार आहेत. संध्याकाळी 7 वाजता या सामन्यांना सुरुवात होईल तर शेवटचा सामना 30 मे रोजी होणार आहे. यंदाच्या IPLवर कोरोनाचं सावट आहे. कोरोनाच्या नव्या गाइडलाइन्स पाळून यंदा IPLचे सामने खेळवले जाणार आहेत. मुंबई इंडियान्स संघाचे सामना कधी आणि कुठे होणार आहेत त्यांचं शेड्युल कसं असणार जाणून घेऊया.

मुंबई इंडिय़न्स संघाचे सामने आणि शेड्युल

9 एप्रिल- मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (MI vs RCB) संध्याकाळी 7.30 वाजता
13 एप्रिल- कोलकाता नाईटरायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (KKR vs MI) संध्याकाळी 7.30 वाजता
17 एप्रिल- मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (MI vs SRH) संध्याकाळी 7.30 वाजता
20 एप्रिल- दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (MI vs DC) संध्याकाळी 7.30 वाजता
23 एप्रिल- पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (PBKS vs MI) संध्याकाळी 7.30 वाजता
29 एप्रिल- मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (MI vs RR)- दुपारी 3.30 वाजता
1 मे- मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स (MI vs CSK) संध्याकाळी 7.30 वाजता
4 मे- सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स (SRH vs MI) संध्याकाळी 7.30 वाजता
8 मे- राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (RR vs MI) संध्याकाळी 7.30 वाजता
10 मे- मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईटरायडर्स (MI vs KKR)  संध्याकाळी 7.30 वाजता
13 मे- मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स (MI vs PBKS) दुपारी 3.30 वाजता
16 मे- चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (CSK vs MI)  संध्याकाळी 7.30 वाजता
20 मे- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स (RCB vs MI) संध्याकाळी 7.30 वाजता
23 मे- मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स  (MI vs DC)- दुपारी 3.30 वाजता

9 एप्रिल रोजी पहिला सामना  मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (MI vs RCB) एम ए चिदंबरम स्टेडियमवर रंगणार आहे. तर शेवटचा सामना 23 मे रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स होणार आहे. 5 वेळा चॅम्पियन ठरलेला मुंबई इंडियन्सचा संघ पुन्हा एकदा विजय मिळवण्यासाठी तयार आहे.

मुंबई इंडियन्स टीममध्ये कोण कोण?

रोहित शर्मा (कर्णधार), क्विटन डिकॉक (विकेटकीपर), ईशान किशन, सूर्यकुमार यादव, क्रिस लिन, सौरभ तिवारी, अनमोलप्रीत सिंह, आदित्य तारे (विकेटकीपर), कृणाल पांड्या, कीरोन पोलार्ड, हार्दिक पांड्या, जेम्स नीशाम, युधिवीर चरक, नाथन कोल्टर-नाइल, अर्जुन तेंडुलकर, मार्को जानसेन