मुंबई इंडियन्सच्या या गोलंदाजाने मैदानावर गमावला स्वत:वरील ताबा, व्हिडीओ व्हायरल

त्याची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Updated: Sep 27, 2021, 02:21 PM IST
मुंबई इंडियन्सच्या या गोलंदाजाने मैदानावर गमावला स्वत:वरील ताबा, व्हिडीओ व्हायरल

दुबई : रविवारी मुंबई इंडियन्स (MI) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) यांच्यात झालेल्या आयपीएल सामन्यात मुंबईचा लेगस्पिनर राहुल चहर स्वत:वर ताबा ठेऊ शकला नाही.  या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा फलंदाज के.एस. भरतची विकेट घेतल्यानंतर राहुल चहर संतप्त प्रतिक्रिया देताना दिसला. त्याची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राहुल चाहरची प्रतिक्रिया पाहून तो भरतावर किती चिडला होता हे स्पष्ट दिसत होते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
 
खरेतर मुंबई इंडियन्सचा (MI) स्पिनल बॉलर राहुल चाहर RCB विरोधात 9 वी ओव्हर टाकत होता आणि केएस भारतने या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर एक लांब सिक्सर ठोकला. हा सिक्सर मारल्यानंतर भरतने खूप उत्साह दाखवला, पण राहुल चहर मात्र निराश झाला. यानंतर पाचव्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात भरतला सूर्यकुमार यादवने लाँगऑफवर साधा झेल दिला. ज्यामुळे तो आऊट झाला.

यानंतर राहुल चहर उत्साहात दिसला आणि भरतला बाद केल्यानंतर तो शिवीगाळ करताना आणि संताप व्यक्त करताना दिसला.

राहुल चहर टी -20 वर्ल्डकपसाठी फिट नाही?

टी -20 वर्ल्ड कपसाठी, निवडकर्त्यांनी युझवेंद्र चहलची हकालपट्टी करून राहुल चहरचा समावेश केला, पण आयपीएल 2021 मध्ये या गोलंदाजाचे पोल उघड झाले. राहुल चाहरची कामगिरी पाहता, विरोधी बॅट्समॅनला त्याच्या बॉलिंगमुळे काही अडचणी येत आहेत असे काही आढळत नाही. जर टी -20 वर्ल्डकपमध्येही राहुल चहरची अशीच कामगिरी असेल, तर ते टीम इंडियासाठी मात्र धोक्याचे ठरु शकेल.

टी -20 वर्ल्ड कपमध्ये राहुल चहरची निवड करण्यावर हा युक्तिवाद देण्यात आला

टी -20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाच्या घोषणेवेळी मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा म्हणाले होते, "आम्हाला संघात एक लेग स्पिनर हवा होता, जो चेंडू उच्च वेगाने फेकू शकेल. जलद गतीने खेळपट्टीवर कोण चांगली पकड मिळवू शकतो. अशा परिस्थितीत आम्ही युजवेंद्र चहल ऐवजी राहुल चहरची निवड केली." पण टी -20 वर्ल्डकपमध्ये युजवेंद्र चहलच्या जागी निवडकर्त्यांनी ज्या फिरकीपटूची निवड केली, त्याने कोणतीही गुणवत्ता दाखवली नाही आणि राहुल चहरची कामगिरी उघड झाली.

युजवेंद्र चहल हा टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या सर्वात जवळच्या खेळाडूंपैकी एक मानला जातो. दोघेही RCB मध्ये एकत्र खेळतात, त्यामुळे त्यांच्यामध्ये चांगलं नात आहे, परंतु असे असूनही, निवडकर्त्यांनी युझवेंद्र चहलला टी -20 वर्ल्डकप संघातून बाहेरचा मार्ग दाखवला. टी 20 वर्ल्डकप 2021 डोक्यावर आहे आणि सर्व संघांनी त्यासाठी तयारी सुरू केली आहे. टी 20 वर्ल्डकप 2021 हे 17 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे.

रविचंद्रन अश्विनलाही संधी

पाच तज्ञ स्पिनर्सची टी 20 संघात निवड करण्यात आली आहे. ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनची टी -20 वर्ल्डकपसाठी निवड झाली आहे. राहुल चहर, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांनाही आयपीएलमधील चांगल्या कामगिरीबद्दल फळ मिळलं आहे.

टी -20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (wk), इशान किशन (wk), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी यांचा संघात समावेश आहे.