IPL 2021 : कोरोनाच्या भयावह परिस्थितीतही भारतातच राहणार न्यूझीलँडचे खेळाडूं, कारणही तसचं आहे......

आयपीएलच्या14 व्या सीझनमध्ये कोरोनाच्या संकटामुळे काही विदेशी खेळाडू ही लीग सोडून जात आहेत. तर त्यांच्या पाठोपाठ काही अंपायर देखील ही लीग सोडून जात आहेत. 

Updated: Apr 29, 2021, 04:49 PM IST
IPL 2021 : कोरोनाच्या भयावह परिस्थितीतही भारतातच राहणार न्यूझीलँडचे खेळाडूं, कारणही तसचं आहे......

मुंबई : आयपीएलच्या14 व्या सीझनमध्ये कोरोनाच्या संकटामुळे काही विदेशी खेळाडू ही लीग सोडून जात आहेत. तर त्यांच्या पाठोपाठ काही अंपायर देखील ही लीग सोडून जात आहेत. परंतु आशा परिस्थिती न्यूझीलँडचे खेळाडू मात्र भारतातच राहण्याचा निर्णय घेत आहेत. पण असे का? हा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर त्याचे कारण आहे, भविष्यात खेळले जाणारे सामने.

न्यूझीलँडच्या खेळाडूंना जूनमध्ये लंडन येथे होणाऱ्या भारत विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये न्यूझीलँड संघातून खेळण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे त्यांना आता भारतातच रहावे लागेल आणि ते येथूनच इंग्लंडला रवाना होतील.

न्यूझीलँडला 2 जूनपासून इंग्लंडविरूद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे, त्यानंतर ते 18 जूनपासून भारत विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात खेळणार आहेत.

न्यूझीलँडचा कर्णधार केन विल्यमसन, वेगवान गोलंदाज काइल जेमिसन आणि ट्रेंट बोल्ट यांच्यासह मिशेल सॅटनरही कसोटी संघात दाखल होणार आहेत आणि हे सर्व खेळाडू सध्या आयपीएलमध्ये भारतात खेळत आहेत.

न्यूझीलँड क्रिकेट असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेथ मिल्स यांनी स्टफ डॉट कॉमला सांगितले की, "आम्हाला या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडला जाणारे खेळाडू सापडले आहेत. ते सध्या आपल्या घरी जाऊ शकत नाहीत किंवा जर ते गेले तर त्यांना दोन आठवड्यांपर्यंत क्वारंटाईनमध्ये राहावे वागेल. परंतु भविष्यातील कसोटी सामन्यांची तारीख पाहता आयपीएल संपल्यानंतर त्यांच्यकडे इतका वेळ नाही.त्यामुळे ते इंग्लंडला जाऊ शकत नाहीत."

मिल्स पुढे म्हणाला की, तो भारतात उपस्थित असलेल्या आपल्या खेळाडू, सदस्य आणि प्रशिक्षक कर्मचार्‍यांच्या संपर्कात आहे. आयपीएलमध्ये सध्या न्यूझीलँडचे 10 खेळाडू आणि कोचिंग स्टाफचे 7 सदस्य आहेत.

तो म्हणाला, "खेळाडुंना तशी चिंता आहे, पण ते ठीक आहेत. आतापर्यंत कुणालाही घरी परत यायचे नाही किंवा असे कोणतेही संकेत त्यांनी दिलेले नाहीत. या कठीण काळात न्यूझीलँडला परत येणे खूप कठीण होईल. ते भारतात सुरक्षित आहेत. आम्हाला विश्वास आहे की, बीसीसीआय ही बाब गांभीर्याने घेईल आणि त्यांची काळजी देखील घेईल."