IPL 2021, DC vs KKR Qualifier 2 | दिल्लीकडून कोलकाताला विजयासाठी 136 धावांचे आव्हान

दिल्लीने (Delhi capitals) कोलकाताला (kolkata knight riders) विजयासाठी 136 धावांचे आव्हान दिले आहे. 

Updated: Oct 13, 2021, 09:34 PM IST
IPL 2021,  DC vs KKR Qualifier 2 | दिल्लीकडून कोलकाताला विजयासाठी 136 धावांचे आव्हान title=

शारजा : आयपीएलच्या 14 व्या मोसमातील दुसरा क्वालिफायर सामना हा दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (DC vs KKR Qualifier 2) यांच्यात खेळवण्यात येत आहे. पहिले बॅटिंग करणाऱ्या दिल्लीने कोलकाताला विजयासाठी 136 धावांचे आव्हान दिले आहे. दिल्लीने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 135 धावा केल्या. (ipl 2021 qualifier 2 dc vs kkr delhi capitals set 136 runs target for  kolkata knight riders)    

दिल्लीची बॅटिंग

दिल्लीकडून सलामीवीर शिखर धवनने सर्वाधिक 36 धावांची खेळी केली. तर श्रेयस अय्यरने नाबाद 30 रन्स केल्या. इतर फलंदाजांना सुरुवात चांगली मिळाली. मात्र त्यांना या खेळीचे मोठ्या आकड्यात रुपांतर करता आले नाही. धवन आणि अय्यरचा अपवाद वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला 20 पेक्षा अधिक धावांचा आकडा गाठता आला नाही.

सलामीवीर पृथ्वी शॉ आणि मार्क्स स्टोयनिसने प्रत्येकी 18 धावा केल्या. शिमरॉन हेटमायर 17 धावा करुन रनआऊट झाला. तर कर्णधार रिषभ पंतने 6 धावाच केल्या. तर अक्षर पटेल 4 धावांवर नाबाद राहिला.

कोलकाताकडून वरुण चक्रवर्थीने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर लॉकी फर्ग्यूसन आणि शिवम मावीने प्रत्येकी 1 विकेट मिळवली. 

दिल्लीचे गोलंदाज 136 धावांचा बचाव करणार? 

या हायव्होलटेज सामन्यात दिल्लीच्या फलंदाजांना विशेष काही करता आले नाही. त्यामुळे दिल्लीच्या 135 धावाच झाल्या. दरम्यान दिल्लीची सर्व कमान ही त्यांच्या गोलंदाजांच्या खांद्यावर आहे. यामुळे दिल्लीचे गोलंदाज या विजयी आव्हानाचं बचाव करतात की कोलकाता अंतिम सामन्यात धडक मारते, याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. 

दिल्ली कॅपिटल्स Playing XI : शिखर धवन, पृथ्वी शॉ, रिषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर) , श्रेयस अय्यर, शिमरॉन हेटमायर, मार्कस स्टोइनिस, अक्षर पटेल, आर अश्विन, कागिसो रबाडा, आवेश खान आणि एनरिक नॉर्खिया.

कोलकाता Playing XI : शुबमन गिल, व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, नितीश राणा, इयॉन मॉर्गन (कर्णधार), शाकिब अल हसन, दिनेश कार्तिक, सुनील नरेन, शिवम मावी, लोकी फर्गुसन आणि वरुण चक्रवर्ती.