खांद्याच्या शस्त्रक्रियेतून सावर असलेल्या श्रेयस अय्यरचं ट्रेनिंग सुरू, व्हिडीओ

8 एप्रिल रोजी श्रेयसच्या खांद्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. श्रेयस हळूहळू रिकव्हर होत आहे. जुलै महिन्यात तो श्रीलंकेविरुद्ध खेळणार का याकडे लक्ष?

Updated: May 14, 2021, 07:53 AM IST
खांद्याच्या शस्त्रक्रियेतून सावर असलेल्या श्रेयस अय्यरचं ट्रेनिंग सुरू, व्हिडीओ title=

मुंबई: टीम इंडियाचा युवा फलंदाज श्रेयस अय्यरच्या खांद्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर आता तो त्यामधून सावर आहे. खांद्याच्या शस्त्रक्रियेमुळे तो IPL खेळू शकला नाही. मात्र सध्या कोरोना व्हायरसमुळे IPLचे सामने अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहेत. तर श्रेयसने मैदानात उतरण्याच्या दृष्टीनं आपली हळूहळू तयारी सुरू केली आहे. 

घरात सुरू केलं वर्कआऊट

श्रेयस अय्यरने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये श्रेयस व्यायाम करत असल्याचं दिसत आहे. कॅप्शनमध्ये वर्कआऊट सुरू आहे असंही त्याने म्हटलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shreyas Iyer (@shreyas41)

खांद्यावर झाली होती शस्त्रक्रिया

मार्च महिन्यात इंग्लंड विरुद्ध वन डे सामन्यात फील्डिंग दरम्यान श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत झाली. ही दुखापत गंभीर असल्यानं शस्त्रक्रिया करावी लागली. 8 एप्रिल रोजी श्रेयसवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर आता श्रेयसने हळूहळू व्यायामाला सुरुवात केली आहे. तो रिकव्हर होत असून मैदानात जाण्याची पूर्वतयारी करत आहे. 

श्रेयस अय्यर IPL खेळू शकणार नसल्यामुळे दिल्ली कॅपिटल्सच्या नेतृत्वाची कमान ऋषभ पंतच्या खांद्यावर देण्यात आली होती. आता जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यादरम्यान श्रेयस टी 20 आणि वन डे सीरिजसाठी खेळणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.