अहमदाबाद: बंगळुरू विरुद्ध झालेल्या अटीतटीच्या सामन्यात दिल्ली संघाला केवळ 1 रनने सामना हातून गमवावा लागला आहे. या सामन्यात विराटसेनेचा 1 रनने विजय झाला आहे. दिल्ली कॅपिटल्स संघातील ज्येष्ठ गोलंदाज आणि स्पिनरने कोरोनाचा नियम मोडल्याचं मैदानात पाहायला मिळालं. त्याने नियम मोडल्यानंतर अंपायरने वॉर्निंग दिली.
दिल्ली कॅपिटल्सचा स्पिनर अमित मिश्राने 7 व्या ओव्हरमध्ये पहिला बॉल टाकण्याआधी त्याला लाळ लावल्याचं दिसून आलं. त्यावेळी अंपयारने त्याला इशारा दिला आहे. कोरोनामुळे बॉलवर लाळ लावण्यासाठी बंदी घालण्यात आली असताना देखील अमित मिश्राने नियमाचं उल्लंघन केलं.
अंपयारने तातडीने त्याचा हातातील बॉल काढून घेत तो पूर्ण सॅनिटाइझ केला आणि त्यानंतर पुन्हा सामना सुरू झाला. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
— pant shirt fc (@pant_fc) April 27, 2021
आयसीसीच्या नियमांनुसार एखाद्या खेळाडूने बॉलवर लाळ लावल्याचं आढळून आल्यास त्याला पहिल्यांदा वॉर्निंग देण्यात येईल. पुन्हा असे झाल्यास दोषी संघाला 5 धावांचा दंड आकारला जाईल. 2020 मध्ये, कोरोना व्हायरसमुळे जगभरातील होणाऱ्या क्रिकेट सामन्यांसाठी संसर्ग टाळण्याच्या दृष्टीनं हा नियम करण्यात आला आहे.