IPL 2021: सुपर से उपर! या खेळाडूनं घेतलेला कॅच पाहून व्हाल हैराण, व्हिडीओ

पंजाबच्या दीपक हुड्डा पाठवलं तंबुत, सुपर से उपर कॅचचा हा व्हिडीओ तुम्ही चुकवला असेल तर पुन्हा एकदा नक्की पाहा

Updated: Sep 25, 2021, 11:12 PM IST
IPL 2021: सुपर से उपर! या खेळाडूनं घेतलेला कॅच पाहून व्हाल हैराण, व्हिडीओ

दुबई: UAEमध्ये आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील सामने सुरू आहेत. आज दोन सामने पार पडले. पहिला सामना दिल्ली विरुद्ध राजस्थान होता. त्यामध्ये दिल्लीने 33 धावांनी विजय मिळवला आहे. तर दुसरा सामना पंजाब विरुद्ध सनरायझर्स हैदराबादचा रंगला. आईपीएलच्या 2021च्या 37 व्या सामन्यामध्ये शारजाह क्रिकेट स्टेडियममध्ये पंजाब विरुद्ध हैदराबाद सामना आहे. या सामन्यात फील्डिंग दरम्यान कमाल कॅच पकडली आहे.

हैदराबाद संघाचा ऑलराऊंडर खेळाडू जगदीशा सुचितने हवेत उडी मारून सुपरमॅन सारखा हा कॅच पकडला आहे. जगदीशला या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली. या संधीचं सोनं त्याने हा कॅच पकडून केल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. जगदीशनं हा कॅच पकडत पंजाबच्या दीपक हुड्डाला कॅच आऊट केलं. 16 व्या ओव्हरमध्ये चौथ्या बॉलवर हा कॅच घेण्यात आला. 

या कॅचचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. अनेकजण या कॅचनंतर जगदीशा सुचितचं तोंडभरून कौतुक करत आहेत. त्याचा हा कॅच पाहून टीममधील खेळाडू देखील हैराण झाले होते. त्याचं सर्वांनी खूप कौतुक देखील केलं. 

पंजाब किंग्सच्या दोन्ही सलामीवीर फलंदाजांना तंबुत पाठवण्यात यश मिळालं. संदीप शर्माने देखील एक भारी कॅच पकडला आहे. निकोलस पूरणने देखील कॅच पकडला होता.