IPL 2021: 'या' संघानं बदलली जर्सी, व्हिडीओ कॉलवर श्रेयस अय्यर, शिखर धवनला दिलं सरप्राइज

IPLच्या 14व्या मौसमाआधी श्रेयस अय्यर आणि शिखर धवनला मोठं सरप्राइज मिळालं आहे. 

Updated: Mar 19, 2021, 02:59 PM IST
IPL 2021: 'या' संघानं बदलली जर्सी, व्हिडीओ कॉलवर श्रेयस अय्यर, शिखर धवनला दिलं सरप्राइज title=

मुंबई: IPLच्या 14व्या मौसमाआधी श्रेयस अय्यर आणि शिखर धवनला मोठं सरप्राइज मिळालं आहे. व्हिडीओ कॉलवरून हे सरप्राइज देण्यात आलं. हे सरप्राइज म्हणजे बदललेल्या जर्सीचं होतं. नवीन सरप्राइज पाहून दोघंही खूप खूश झाले. त्यांनी व्हिडीओ कॉलवर आपल्या भावना व्यक्त केल्या.

जगातील सर्वात मोठा आणि प्रसिद्ध IPL2021च्या 14व्या हंगामाला 9 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. 8 संघांमध्ये 6 शहरात हा सामना रंगणार आहे. याच पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या संघांची तयारी सुरू आहे. IPL सुरू होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सनं आपली नवीन जर्सी लाँच केली आहे. या नव्या जर्सीचा लूकही विशेष आहे. या नव्या जर्सीचं खास सरप्राइज शिखर धवन आणि श्रेयस अय्यरला व्हिडीओ कॉलद्वारे देण्यात आलं.

ही नवी जर्सी पाहून दोघंही खूप खुश झाले. तर मी खूप जळत आहे. मी खूप जास्त जळतोय तुमचा हेवाही तेवढाच वाटतो आहे कारण सर्वात पहिल्यांदा तुम्हाला ही नवीन जर्सी घालता आली. ही जर्सी मला घाण्याची संधी अजून मिळाली नाहीय पण ती जर्सी घालण्यासाठी मी आतूर आहे असं श्रेयस अय्यरने व्हिडीओ कॉलवर सांगितलं आहे.

दिल्ली कॅपिटल्सनं नव्या जर्सीचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. सध्या श्रेयस अय्यर भारतीय संघाकडून इंग्लंड विरुद्ध टी 20 सीरिज खेळत आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर हे सामने सुरू आहेत. भारत विरुद्ध इंग्लंड 5 टी 20 सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघानी 2-2 अशी बरोबरी केली आहे.