IPL 2022, GT vs LSG | गुजरातने पदार्पणातील सामन्यात टॉस जिंकला

लखनऊ सुपर जायंट्स (lucknow supergiants) आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही नवे संघ आमनेसामने भिडणार आहेत.

Updated: Mar 28, 2022, 07:21 PM IST
IPL 2022, GT vs LSG | गुजरातने पदार्पणातील सामन्यात टॉस जिंकला    title=

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) चौथा सामना आज (28 मार्च) खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स (lucknow supergiants) आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही नवे संघ आमनेसामने भिडणार आहेत. दोन्ही संघांचा हा पदार्पणातील सामना आहे. गुजरातने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. या सामन्याला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर थोड्याच वेळात म्हणजेच 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. (ipl 2022 4th match gt vs lsg gujarat titans win the toss and elect to Fielding at wankhede stadium mumbai) 

गुजरातचे अकरा शिलेदार : हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुभमन गिल, मॅथ्यू वेड,  डेव्हिड मिलर,  विजय शंकर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, राशिद खान, लॉकी फर्ग्यून, वरुण एरॉन आणि मोहम्मद शमी. 

लखनऊ प्लेइंग इलेव्हन : केएल राहुल (कॅप्टन),  क्विटंन डी कॉक, एविन लुईस,  मनीष पांडे, दीपक हुड्डा, क्रृणाल पंड्या, आयुष बडोनी,  रवी बिश्नोई,  आवेश खान,  दुष्मंता चमीरा आणि मोहसिन खान.