IPL 2022 मेगा ऑक्शनमध्ये हे खेळाडू मालामाल होणार, दिग्गजाची भविष्यावाणी

 आयपीएलच्या 22 व्या मोसमाला अवघे काही महिने राहिले आहेत. 

Updated: Dec 7, 2021, 06:29 PM IST
IPL 2022 मेगा ऑक्शनमध्ये हे खेळाडू मालामाल होणार, दिग्गजाची भविष्यावाणी title=

मुंबई : आयपीएलच्या 22 व्या मोसमाला अवघे काही महिने राहिले आहेत. या 15 व्या मोसमात लखनऊ आणि अहमदाबाद हे दोन नवे संघ सहभागी होणार आहेत. त्यात मेगा ऑक्शन पार पडणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. या मेगा ऑक्शच्या पार्श्वभूमीवर समालोचक आकाश चोप्राने मोठी भविष्यवाणी केली आहे. (IPL 2022 Aakash Chopra prediction that these 5 star players will be the most expensive in mega auction 2022)  

आगामी मेगा ऑक्शनमध्ये 5 कॅप्ड भारतीय खेळाडू हे महागडे ठरतील, अशी भविष्यवाणी आकाश चोप्राने केली आहे. आकाशनुसार, हार्दिक पंड्या, शिखर धवन, दीपक चाहर, राहुल चाहर आणि शिखर धवन हे खेळाडू महागडे ठरतील.  

हार्दिक पंड्या

स्टार ऑलराऊंडर हार्दिक पंड्याला (Hardik Pandya) यावेळेस मुंबईने (Mumbai Indians) संघात कायम राखले नाही. त्यामुळे हार्दिकवर या मेगा ऑक्शनमध्ये बोली लागू शकते. हार्दिकमध्ये निर्णायक क्षणी सामना फिरवण्याची क्षमता आहे. मात्र तो गेल्या काही महिन्यांपासून आऊट ऑफ फॉर्म आहे. त्यामुळे त्याला रिलीज करण्यात आले. मात्र यानंतरही हार्दिकला आपल्या संघात घेण्यासाठी मुंबई व्यतिरिक्त संघात चढाओढ पाहायला मिळेल हे निश्चित.  

शिखर धवन 

दिल्लीने गब्बर शिखर धवनला रिलीज केलंय. धवनने दिल्लीसाठी अनेकदा मॅचविनिंग खेळी केली आहे. शांत आणि मूडी स्वभावाच्या धवनने अनेक वेळा दिल्लीला विजय मिळवून दिलाय. तसेच शिखरमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता आहे. यामुळे शिखरला आपल्या संघात घेण्याचा प्रयत्न फ्रँचायजींचा असेल

हर्षल पटेल 

बंगळुरुकडून खेळणाऱ्या या युवा गोलंदाजाने 14 व्या मोसमात आपली छाप सोडली. हर्षलने भेदक गोलंदाजीच्या जोरावर 14 व्या हंगामात 32 विकेट्स घेतल्या होत्या. यासह हर्षल एका मोसमात सर्वाधिक विकेट्स घेणारा पहिला भारतीय ठरला. त्याला या कामगिरीसाठी पर्पल कॅप देऊन गौरवण्यात आलं होतं. 
त्यामुळे आता हर्षलवर यावेळेस मोठी बोली लागू शकते. 

दीपक चाहर 

दीपकला चेन्नईने रिलीज केलंय. दीपकने 14 व्या मोसमात चमकदार कामगिरी केली. त्याने 15 सामन्यात 14 विकेट्स घेतल्या. दीपकने टाकलेल्या स्विंगचा सामना करणं हे आव्हानात्मक असतं. त्यामुळे आता दीपकवर आता कोण बोली लावणार, याकडे लक्ष असेल.
      
राहुल चाहर 

राहुल चाहर त्याच्या घातक गोलंदाजीसाठी ओळखळा जातो. राहुलने 14 व्या मोसमात मुंबईकडून खेळताना चांगली गोलंदाजी केली.  त्याने आतापर्यंत एकूण 42 सामन्यांमध्ये 43 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे आता राहुल कोणत्या संघात दाखल होणार, याकडे लक्ष असेल.