IPL 2022 : केन विल्यमसनने जिंकला टॉस, CSK आणि SHR मध्ये मोठे बदल

3 सामने गमवल्यानंतर रविंद्र जडेजानं काढला हुकमी एक्का, हैदराबाद टीममध्येही मोठा बदल

Updated: Apr 9, 2022, 03:25 PM IST
IPL 2022 : केन विल्यमसनने जिंकला टॉस, CSK आणि SHR मध्ये मोठे बदल title=

मुंबई : आयपीएलमध्ये पंधराव्या हंगामातील 17 वा सामना होत आहे. चेन्नई विरुद्ध हैदराबाद सामना होत आहे. डी वाय पाटील स्टेडियमवर या सामन्याला 3.30 वाजता सुरुवात होत आहे. केन विल्यमसनने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. चेन्नईला पहिल्यांदा बॅटिंग करावी लागणार आहे. 

गेल्या तीन सामन्यांमध्ये चेन्नईला एकही सामना जिंकता आला नाही. हा सामना जिंकण्यासाठी रविंद्र जडेजानं कंबर कसली. चेन्नई सुपर किंग्जने टीममध्ये एक बदल केला. प्रिटोरियसच्या जागी दीक्षाणाला संधी देण्यात आली आहे. 

सनरायझर्स हैदराबादने 2 बदल केले आहेत.  मार्को जानसेन आणि शशांक सिंगला डेब्यू करण्याची संधी दिली आहे. पॉईंट टेबलवर हैदराबाद टीम शेवटून पहिली आहे. यावेळी खातं उघडण्यात यश मिळणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

प्लेइंग इलेव्हन: रॉबिन उथप्पा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, ड्वेन ब्राव्हो, ख्रिस जॉर्डन, महिश दिक्षाणा आणि मुकेश चौधरी

प्लेइंग इलेव्हन: अभिषेक शर्मा, केन विल्यमसन, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन, शशांक सिंग, वॉशिंग्टन सुंदर, भावुनेश्वर कुमार, मार्को जॉन्सन, उमरान मलिक आणि टी नटराजन

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x