IPL 2022 | चेन्नईला मोठा झटका, स्टार ऑलराउंडर 15 व्या मोसमातून बाहेर

चार वेळा आयपीएल चॅम्पियन ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) मोठा झटका बसला आहे.

Updated: Apr 15, 2022, 08:59 PM IST
IPL 2022 | चेन्नईला मोठा झटका, स्टार ऑलराउंडर 15 व्या मोसमातून बाहेर title=

मुंबई :  चेन्नई सुपर किंग्जची (CSK) आयपीएलच्या 15 व्या मोसमात निराशाजनक सुरुवात झाली. सलग 4 पराभवानंतर चेन्नईचा पाचव्या सामन्यात विजय झाला. खेळाडू आऊट ऑफ फॉर्म असल्याने चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला. त्यात आता आणखी भर पडली आहे. चेन्नईचा स्टार ऑलराऊंडर खेळाडू हा दुखापतीमुळे या 15 व्या मोसमातून बाहेर पडला आहे. त्यामुळे चेन्नईसाठी हा मोठा धक्का आहे. (ipl 2022 csk chennai super kings star allrounder deepak chahar ruled out in 15th season due to injurey) 

चेन्नईचा स्टार ऑलराऊंडर दीपक चाहरला दुखापतीमुळे या 15 व्या मोसमातून बाहेर पडावं लागलं आहे. दीपक हा या मोसमातील इशान किशननंतर सर्वात दुसरा महागडा खेळाडू आहे. मात्र आता दीपक नसल्याने चेन्नईच्या डोकेदुखीत कमालीची वाढ झाली आहे.

दीपक चेन्नईचा महत्त्वाचा खेळाडू होता. त्याने अनेकदा चेन्नईला एकहाती सामने जिंकून दिले होते. त्यामुळे चेन्नईला अडचणीत असताना दीपकची उणीव भासणार आहे.  

दीपकला फेब्रुवारी महिन्यात वेस्टइंडिज विरुद्धच्या तिसऱ्या टी 20 सामन्यात दुखापत झाली होती. दीपकच्या मांडीच्या स्नायूंना दुखापत झाली होती.