IPL 2022 | दिल्लीच्या टीममध्ये या दिग्गजाची एन्ट्री, विरोधी संघात भितीचं वातावरण

आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (IPL 2022) सुरू होण्यास काही दिवस बाकी आहेत. त्याआधी सर्व संघ आपली रणनीती तयार करत आहेत. 

Updated: Mar 9, 2022, 10:41 PM IST
IPL 2022 | दिल्लीच्या टीममध्ये या दिग्गजाची एन्ट्री, विरोधी संघात भितीचं वातावरण   title=
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (IPL 2022) सुरू होण्यास काही दिवस बाकी आहेत. त्याआधी सर्व संघ आपली रणनीती तयार करत आहेत. दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitaks) आयपीएल मेगा लिलावामध्ये (IPL Mega Auction 2022) अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश केला आहे, परंतु आता आयपीएल 2022 च्या आधी ऋषभ पंतच्या संघात दिग्गज प्रशिक्षकाचा समावेश करण्यात आला आहे. (ipl 2022 delhi capitals biju george rishabh pant mohammad kaif)

आयपीएल 2022 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सने धाकड फिल्डिंग कोच बिजू जॉर्जचा टीममध्ये समावेश केला आहे. बिजू जॉर्जच्या एन्ट्रीमुळे दिल्ली कोचिंग स्टाफ आणखी तडगा झाला आहे. बिजू जॉर्जच्या अनुभवाचा टीमला चांगला फायदा होऊ शकतो. बिजू जॉर्जचा मोहम्मद कैफच्या जागी कोचिंग स्टाफमध्ये समावेश करण्यात आला आहे.  

क्रिकबझच्या वृत्तानुसार, बिजू जॉर्ज यांना फिल्डिंग कोचची जबाबदारी देण्यात आल्याची माहितीची खातरजमा दिल्ली कॅपिट्लच्या सूत्रांनी केली आहे. बिजू जॉर्ज यांना प्रशिक्षकपदाचा प्रदीर्घ असा अनुभव आहे.

बिजू जॉर्ज यांनी याआधी वूमन्स टीम इंडियाला कोचिंग केलं आहे तसेच आयपीएलमध्ये 2015 आणि 2016 या दोन मोसमातही अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. तसेच  2020 मध्ये आयपीएलमध्ये हैदराबाद टीमसाठीही त्यांनी योगदान दिलंय.