मुंबई : आयपीएल 2022 चे सामने सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहे. यापूर्वी टीम इंडिया आणि गुजरातसाठी आनंदाची बातमी आहे. टीम इंडियाचा विस्फोटक ऑलराऊंडर रिकव्हर होत आहे. आता तो फिट असून लवकरच मैदानात परतणार आहे. त्याच्या हेल्थसंदर्भात सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून आपल्या फिटनेसमुळे तो खराब फॉर्ममध्ये होता. त्यामुळे त्याने ब्रेक घेतला होता. आता पुन्हा एकदा मैदानात खेळताना दिसणार आहे.
गुजरात संघाच्या डायरेक्टर ऑफ क्रिकेट विक्रम सोलंकी यांनी या खेळाडूसंदर्भातील एक मोठी अपडेट दिली आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वी हा खेळाडू फिट होणार असून मैदानात उतरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. टीम इंडियाचा ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पांड्याच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे. पांड्या लवकरच मैदानात परतणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून पांड्याच्या फिटनेसवर खूप जास्त प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर पांड्याने ब्रेक घेतला. त्याची प्रकृती उत्तम झाली असून आयपीएलमध्ये तो पूर्ण ताकदीनं उतरताना दिसणार आहे. हार्दिक पांड्याकडे गुजरात संघाचं नेतृत्व आहे.
हार्दिकच्या हेल्थची चांगली प्रगती होत असल्याचा विक्रम सोलंकीचा विश्वास आहे, 'द टेलिग्राफ'ला दिलेल्या मुलाखतीत विक्रम सोलंकी म्हणाला, "हार्दिक पंड्या त्याच्या खेळाच्या प्रत्येक टप्प्यावर कठोर परिश्रम घेताना दिसत आहे. तो सध्या फिट आहे आयपीएलमध्ये तो चांगल्या फॉर्ममध्ये मैदानात उतरेल असा विश्वास सोलंकी यांनी व्यक्त केला आहे.
हार्दिक पांड्याचा फिटनेस गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियासाठी चिंतेचा विषय आहे. 2018 एशिया कप दरम्यान त्याच्या पाठीचं दुखणं पुन्हा सुरू झालं. त्यानंतर पांड्याने गोलंदाजी बंद केली. टी 20 वर्ल्ड कपनंतर त्याला संघातून खेळण्याची फारशी संधीही देण्यात आली नाही. त्यानंतर पांड्याने स्वत: ब्रेक घेतला. आता पुन्हा पांड्या मैदानात उतरताना दिसणार आहे.